लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या विकेल ते पिकेल या योजनेचा पुरता फज्जा उडाली असून, बाजारपेठा नसल्याने शेतकऱ्यांवर पिकात जनावरे सोडण्याची वेळ आली आहे.लवकरच खरीप हंगाम सुरू होणार असून निदान त्यासाठी तरी मशागत करून जमीन तयार ठेवता येईल या हिशेबाने शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याला उठाव नाही. तो जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. यात शेतकºयाचे मोठे नुकसान झाले आहे.विकेल ते पिकेल या हिशेबाने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर यंदा भाजीपाला लावला होता. मात्र लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नाही, शेतमालासाठी गाड्या नाहीत अशी स्थिती आहे. घरपोच भाजीपाला या योजनेत भाजीपाला दिला जात असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या कारणाने शेतकरी हवालदील झाले आहेत.
बळीराजा हताश; भाजीपाल्यात सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 18:41 IST
Wardha news महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या विकेल ते पिकेल या योजनेचा पुरता फज्जा उडाली असून, बाजारपेठा नसल्याने शेतकऱ्यांवर पिकात जनावरे सोडण्याची वेळ आली आहे.
बळीराजा हताश; भाजीपाल्यात सोडली जनावरे
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे विकेल ते पिकेल योजनेचा उडाला फज्जा