शेतकऱ्यांचा शेतमाल राहतो उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:16+5:30

जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून परतीचा पाऊस सलामी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेत ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी घरूनच ताडपत्री न्यावी लागत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असून अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा श्रमाचा मोबदलाही देणे शिल्लक आहे.

Farmers' commodities remain open | शेतकऱ्यांचा शेतमाल राहतो उघड्यावर

शेतकऱ्यांचा शेतमाल राहतो उघड्यावर

ठळक मुद्देलिलाव शेड ‘फुल्ल’ : नुकसान झाल्यास जबाबदारी कुणाची?

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सोयाबीनची मळणी सुरू असल्याने बहुतांश शेतकरी शेतातूनच सोयाबीनची पोती थेट बाजार समितीत नेत आहेत. सेलूच्या बाजार समितीत आवक वाढली असून सध्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल उघड्यावरच ठेवावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अचानक पाऊस पडल्यास त्याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागू शकतो. अशावेळी होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कुणाची असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांकडून विचारला जात असून बाजार समिती प्रशासनानेही तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. शिवाय तशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
मंगळवारी बाजारपेठ बंद असतानाही शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळच्या लिलावात आपला शेतमाल विकला जावा या आशेने मोठ्या प्रमाणात शेतमाल आणला. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांवर दिवाळी हा सण असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या बाजारपेठेत शेतमालाची आवक वाढली आहे. असे असले तरी मोठ्या विस्तीर्ण जागेत असलेले लिलाव शेड हाऊस फुल्ल असल्याने सध्या शेतकऱ्यांनाच त्यांचा शेतमाल उघड्यावर ठेवावा लागत आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून परतीचा पाऊस सलामी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेत ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी घरूनच ताडपत्री न्यावी लागत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असून अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा श्रमाचा मोबदलाही देणे शिल्लक आहे. विशेष म्हणजे लिलाव शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Farmers' commodities remain open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.