शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
2
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
3
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
4
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
5
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
6
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
7
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
8
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
10
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
11
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
12
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
13
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
14
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
15
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
16
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
17
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
18
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
19
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

हमीभावासाठी शेतकºयांचा पुलावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:06 AM

सोयाबीनला नाफेडतर्फे ३०५० रुपये हमीभाव तर व्यापारी २३०० ते २५०० रुपये भाव देत आहे. या भेदभावामुळे वर्धा बाजार समितीत सोयाबीन आणलेले शेतकरी संतप्त झाले.

ठळक मुद्देअर्धा तास रस्तारोको आंदोलन : चारही रस्त्यांवर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोयाबीनला नाफेडतर्फे ३०५० रुपये हमीभाव तर व्यापारी २३०० ते २५०० रुपये भाव देत आहे. या भेदभावामुळे वर्धा बाजार समितीत सोयाबीन आणलेले शेतकरी संतप्त झाले. सोयाबीनला हमीभाव मिळावा, अशी मागणी करीत शेतकºयांनी उड्डाण पुलावर रस्तारोको आंदोलन सुरू केले. अर्धा तासाच्या आंदोलनामुळे चारही मार्गांवर दीड ते दोन किमी वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर बाजार समितीने मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांचे सोयाबीन ओले झाले. परिणामी, दिवाळीपूर्वी शेतकºयांना ते विकता आले नाही. शिवाय बाजारात आणलेल्या सोयाबीनला व्यापारीही अधिक भाव देण्यास तयार नाहीत. यामुळे शेतकरी त्रस्त आहे. वर्धा बाजार समितीमध्ये दोन दिवसांपासून शेतकºयांनी सोयाबीन आणले; पण आॅनलाईन ‘बीडींग’मुळे खरेदीला विलंब होतोय. परिणामी, शेतकºयांची ताटकळ होत आहे. बुधवारीही बाजार समितीमध्ये सुमारे १०० शेतकºयांनी सोयाबीन विक्रीस आणले. यात व्यापारी २३०० ते २५०० रुपयांपर्यंत भाव देत आहे. उलट नाफेडमार्फत नोंदणी केलेल्या शेतकºयांचे सोयाबीन ३०५० या हमीभावाने खरेदी केले जात आहे. यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष पसरला होता. या संतापाचा उद्रेक होऊन आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर बाजार समितीच्या गेटसमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी रस्त्यावर बसल्याने वाहने जागीच थबकली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे बाजार समिती तथा पोलीस यंत्रणेमध्ये चांगलीच खळबळ माजली. दोन पोलीस कर्मचारी शेतकºयांना समजविण्याचा प्रयत्न करीत होते; पण शेतकरी सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत मागण्यांवर अडून होते.अखेर कृउबास सभापती श्याम कार्लेकर यांनी आंदोलनस्थळी दाखल होत शेतकºयांना समजाविले. शिवाय जिहाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा मार्केटींग अधिकारी अजय बिसणे यांच्याशी बोलणे करून दिले. यावरून आंदोलन मागे घेण्यात आले. केवळ अर्धा तास शेतकºयांनी रस्ता रोखून धरला असता बजाज चौकासह यवतमाळ व हिंगणघाट मार्गावर दीड-दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन संपल्यानंतर पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यास तब्बल एक तास लागला. शहर पोलीस विलंबाने पोहोचल्याने वाहतूक विस्कळीत होऊन सामान्यांनाही त्रास सहन करावा लागला.जाचक अटींमुळे वाढल्या अडचणीनाफेड तथा बाजार समितीमधील लिलावातही शेतमाल खरेदीवर अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. माल बरोबर नाही, मॉईश्चर आहे, ओला आहे, दाणा बारिक आहे, अशा एक ना अनेक बाबी सांगून शेतकºयांचा शेतमाल कवडीमोल भावात खरेदी करण्याचा प्रयत्न व्यापाºयांकडून करण्यात येत आहे. ओल्या सोयाबीनला तर ९०० ते १५०० रुपयांपर्यंतच भाव दिला जात असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.खरेदी न करण्याचा व्यापाºयांचा मानसआॅनलाईन प्रक्रियेमुळे शेतमाल खरेदीमध्ये अनेक अडचणी येत आहेत. लिलावामध्ये बोली लावताना चांगल्या तथा हलक्या प्रतीच्या मालावरही सारखीच बोली लावली जात आहे. यात दोन्ही प्रकारच्या शेतमालाला एकच भाव द्यावा लागत असल्याने नुकसान होत असल्याचे व्यापाºयांचे मत आहे. आमचे दिवाळे काढता काय, असे म्हणत व्यापारीही सोयाबीन खरेदीतून अंग काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. यामुळे शेतकºयांची अडचण आणखी वाढणार असल्याचेच दिसून येत आहे.नाफेडसाठी आॅनलाईन नोंदणी गरजेचीनाफेडला माल द्यायचा असल्यास शेतकºयांना आधी आॅनलाईन नोंदणी करावी लागत आहे. यानंतर संबंधित शेतकºयांच्या सोयाबीनची प्रत तपासून त्यांना माल आणण्याच्या सूचना एसएमएसद्वारे केल्या जात आहे. यानंतर सदर मालाची खरेदी केली जाते. बाजार समितीच्या लिलावात आणलेला माल नाफेड खरेदी करू शकत नाही. ही बाब लक्षात न आल्यानेही शेतकºयांचा संताप अनावर झाला होता.अधिकाºयांच्या भेटीची प्रतीक्षाजिल्हाधिकारी तथा जिल्हा मार्केटींग अधिकाºयांशी बोलणी झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर बाजार समितीचे सचिव समीर पेंडके यांनी पुन्हा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी पप्पी साहू व शेतकºयांचे भ्रमणध्वसनीवर बोलणे करून दिले. यानंतर अधिकाºयांनी बाजार समितीत भेट देत तोडगा काढण्याची ग्वाही दिली होती. यामुळे शेतकरी अधिकाºयांच्या प्रतीक्षेत होते. काय तोडगा निघाला, हे सायंकाळपर्यंत कळू शकले नाही.