शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

शेतकऱ्यांनो सावधान, जरा जपून टाका पावलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 5:00 AM

शेतकऱ्यांना शेतात कामे करण्यासाठी सोबतच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढावते. अशा अनेक घटना जानेवारी ते जुलै या कालावधीत घडत आहेत.

ठळक मुद्देसात महिन्यांत जिल्ह्यात ३७६ जणांना ‘स्नेक बाईट’ : पुलगाव तालुक्यात घडल्या सर्वाधिक घटना

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यात शेती कामांना वेग येतो. सोबतच बरसणाऱ्या पावसामुळे पिके जोमाने बहरतात. मात्र, अशावेळी सरपटणारे सापही याच शेतात वावरत असतात. तेव्हा शेतकऱ्यांनो अशावेळी सावध राहून शेतीकामे करणे गरजेचे झाले आहे. कारण जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ३७६ जणांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.शेतकऱ्यांना शेतात कामे करण्यासाठी सोबतच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढावते. अशा अनेक घटना जानेवारी ते जुलै या कालावधीत घडत आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर या महिन्यांत सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते.जिल्ह्यात बहुतांश नागरिकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना दररोज आपल्या शेतात जावेच लागते. शेतात जाताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर सापांपासून स्वत:चे संरक्षण करणे कठीण जाते. यातूनच यावर्षी सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. सर्वाधिक घटना सर्पदंशाच्या घटना जुन आणि जुलै महिन्यात घडल्याच्या नोंदी जिल्हा सामान्य रुग्णालयात आहेत. जून महिन्यात १४६ तर जुलै महिन्यात १०१ जणांना सर्पदंश झाला आहे.जहर फवारणीने १५ शेतकरी बाधितसध्या शेती मशागतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतात फवारणी करण्याची कामे जोरात सुरु आहे. फवारणी करतेवेळी योग्य काळजी न घेतल्याने फवारणीच्या विषबाधाने जिल्ह्यातील १५ शेतकरी, बाधित झाले आहे. फवारणी करताना अनेकांना विषबाधा झाली असून मृत्यूच्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे फवारणी करताना दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.मृत्यूची नोंद नाहीशेतात काम करीत असताना साप चावल्यास शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची कुठलीही नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात नाही. मात्र, पोलीस दफ्तरी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात येत असतात. शेतकरी दगावल्यानंतर कुणीही याची नोंद रुग्णालयाकडे करण्यास जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्पदशांने मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयाकडे नसल्याची माहिती आहे.तीन महिन्यांत सर्वाधिक घटनापावसाळ्याचे दिवस असून शेतकरी शेतीकामात व्यस्त आहेत. अशातच सर्पटणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात ३४, जून महिन्यात १४६ तर जुलै महिन्यात १०१ जणांना सर्पदंश झाल्याची माहिती आहे.आवश्यक लस उपलब्धसर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून त्यावर आवश्यक असलेली लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन दिली आहे. तरीही सर्पदंश होताच तत्काळ रुग्णालय गाठावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :snakeसापFarmerशेतकरी