शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बोंडअळीच्या मदतीच्या घोषणेने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:49 IST

हल्लाबोल यात्रेदरम्यान बोंड अळीच्या हल्ल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांना आवाहन करीत त्यांच्याकडून कपाशीच्या पिकावर नागर फिरवून ही व्यथा शासन दरबारी पोहोचविण्याची विनंती केली.

ठळक मुद्देमागणीची सुरूवात पवनारातून : दोन हेक्टरपर्यंत मिळणार शेतकऱ्यांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : हल्लाबोल यात्रेदरम्यान बोंड अळीच्या हल्ल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांना आवाहन करीत त्यांच्याकडून कपाशीच्या पिकावर नागर फिरवून ही व्यथा शासन दरबारी पोहोचविण्याची विनंती केली. शिवाय शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनेही केली. याची शासनाला दखल घ्यावी लागली. शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकत भरघोस मदत जाहीर केली. यामुळे शेतकरी सुखावला आहे.कृषी सहायक प्रशांत भोयर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार पवनार शिवारात ५३९ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. ४०० हेक्टरचा सर्व्हे आटोपला. काही शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद न केल्याने त्यांचा सर्व्हे करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. २०१७-१८ ची पीक नोंदणी तलाठी कार्यालयात सुरू आहे. पिकांची नोंद न करणाऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकणार नाही, तेव्हा अशा शेतकऱ्यांनी त्वरित नोंद करून घेण्याचे आवाहन तलाठी लवणकर यांनी दवंडीद्वारे केले आहे. यात ठेक्याने, मक्त्याने शेती करणाऱ्यांची मुख्य अडचण आहे. सुमारे २०० हेक्टर हेत्र हे ठेका, बटईने केलेले आहे. ठेकापत्र न केल्याने ही मदत मूळ मालकाला मिळेल. यामुळे ज्याचे नुकसान झाले, तो मात्र मदतीपासून वंचित राहील. मूळ मालक हा ठेक्याने जमीन देताना पूर्ण रक्कम आधीच घेत असतो. यामुळे त्यातून कपात करण्याची सोय नाही. ठेक्याने, बटईने शेती करणाऱ्यांचा वेगळा सर्व्हे करून जमीन कसणाऱ्याला मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता ठेकापत्र करायचे म्हटल्यास मूळ मालक तयार होत नसल्याचे दिसते.बोंडअळीने त्रस्त शेतकऱ्याने शेतात फिरविला नांगरआर्वी - बोंडअळीने शेतकरी त्रस्त आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. परिणामी, बोंडअळीला कंटाळून आर्वी तालुक्यातील जळगाव येथील धनंजय चौबे या शेतकऱ्याने कपाशीच्या शेतात ट्रक्टरद्वारे नांगर फिरविला आहे. उत्पन्नच मिळणार नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. हा प्रकार तालुक्यात अनेक ठिकाणी पाहावयास मिळतो.शेतकरी हवालदिलनाचणगाव - गुलाबी बोंडअळीने जिल्ह्यात थैमान घातले. देवळी तालुक्यात या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो. या अळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. देवळी तालुक्यात २९,८३४ हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली होती. पैकी २५,३५९ हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले. एकूण ४,३३५ शेतकऱ्यांनी जी फार्म अर्ज कृषी कार्यालय वा कृषी अधिकारी पं.स. देवळी यांना सादर केले. २१ डिसेंबरपर्यंत ९१२९.२४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे शासनामार्फत करण्यात आले आहे. उर्वरित पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे.मदतीबाबत संभ्रमजी फार्म भरलेले शेतकरीच शासनाकडून बोंडअळीच्या मदतीस पात्र ठरतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पॉकीट खरेदीची बिले अनेकांकडे नाही; पण नुकसान सर्वांचेच झाले आहे. बोंडअळीमुळे नुकसानापोटी कापूस उत्पादक शेतकऱ्यास एनडीआरएफ मार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८००० रुपये, कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्याकडून मिळणारी १६ हजार रुपये मदत, अशी साधारणपणे ३० हजार ८०० रुपये मदत मिळणार आहे. बागायती कापूस उत्पादक शेतकºयांना ही मदत अधिक राहणार आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंत राहणार आहे.