शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

शेतकऱ्याने साडेतीन एकरातील सोयाबीनवर चालविला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी घनश्याम बारंगे यांनी सहा एकरात यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. यावर्षीच्या अतिपावसाने आधीच शेतकरी संकटात असताना ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन कापणी रखडल्याने शेतात साडेतीन एकरातील सोयाबीन कुजले. त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार असल्याने घनश्याम बारंगे यांनी साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटावेटर चालविला.

ठळक मुद्देसोयाबीन कुजले, कपाशीला बोंडच नाही : कारंजा तालुक्यातील गवंडी येथील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. त्यात परतीच्या पावसानेही चांगला दणका दिल्याने तोंडाशी आलेले सोयाबीन शेतातच कुजले. कपाशीचीही जोमाने वाढ झाली पण; बोंड नगण्यच. त्यामुळे नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र २८ जुलै रोजी तालुक्यात १०३ पावसाची नोंद असतानाही कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झालीच नसल्याचा कांगावा करीत तालुका प्रशासनानेही दुर्लक्ष केले. परिणामी, हतबल झालेल्या गवंडी येथील एका शेतकºयाने साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटाव्हेटर चालविले. तर दुसऱ्या शेतकऱ्याने कपाशीच उपटून टाकल्याच वास्तव पुढे आलं आहे.कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी घनश्याम बारंगे यांनी सहा एकरात यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. यावर्षीच्या अतिपावसाने आधीच शेतकरी संकटात असताना ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन कापणी रखडल्याने शेतात साडेतीन एकरातील सोयाबीन कुजले. त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार असल्याने घनश्याम बारंगे यांनी साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटावेटर चालविला. डोेळ्यादेखत मेहनतीने फुलविल्या पिकावर रोटाव्हेटर चालविताना पापण्याआड पाणी तरळत होते. हीच परिस्थिती कपाशीचीही झाली आहे. कपाशी दुरुन उंच आणि हिरवीगार दिसत असली तरी आत गेल्यानंतर मोजकेच बोंड दिसत असल्याने कपाशीच्या उत्पादनाचाही भरवसा राहिला नाही. म्हणून काही शेतकऱ्यांनी आता पऱ्हाटी उपटण्याचाही निर्णय घेतला आहे. तालुक्यात अतिवृष्टी असतानाही प्रशासनाने पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी देविदास घागरे, घनश्याम बारंगे व पिंटू डोबे आदी शेतकºयांनी केली आहे.जिल्ह्याला मिळाले ४० लाखऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, जमिन महसुलात सूट, शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी आदी विविध सवलती देण्याच्या उद्देशाने शासनाकडून वर्धा जिल्ह्याला ४० लाख २५ हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. विशेषत: प्रत्यक्षात नुकसान जास्त असल्याची वास्तव परिस्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी