जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पाहिजे!
By Admin | Updated: January 24, 2016 02:07 IST2016-01-24T02:07:46+5:302016-01-24T02:07:46+5:30
चुकीच्या धोरणांमुळे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पाहिजे!
किशोर तिवारी : शेतकरी आत्महत्या एक वास्तव - उपाय व चिंतन या विषयावर व्याख्यान
हिंगणघाट : चुकीच्या धोरणांमुळे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे. त्यांच्या जीवावर जगणारे व्यापारी, दलाल कधीच आत्महत्या करीत नाही. तेव्हा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पहिजे, असे मत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र शासन विभागाचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले.
भारतीय युवा सस्कार परिषद आणि भारतीय बहुउद्देशीय युवा संस्कार मंडळ, हिंगणघाटच्या वतीने आयोजित आयोजित व्याख्यानमालेत शेतकरी आत्महत्या एक वास्तव - उपाय व चिंतन या विषयांवर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृउबासचे सभापती तथा नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी होते. उद्घाटक म्हणून पं.स. चे. माजी सभापती वासुदेव गौळकार, परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक डॉ. उषा साजापूरकर, प्रा. डॉ. शरद कुहीकर, संस्कार मंडळाचे सचिव प्रदीप नागपूरकर आदी उपस्थित होते.
चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेत आयोजित व्याख्यानमालेची सुरूवात शेतकरी हल्ल्यात शहीद जवान तथा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त बांधवांना दोन मिनिट मौन श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कोठारी यावेळी म्हणाले शेतकरी नसेल तर जगाची आणि शेतीचा कल्पनाही करता येत नाही. त्यामुळे शेतकरी कसा सुखी होईल याकडे शासनाने आणि आपण सर्वांनीच लक्ष देणे गरजेचे हे आहे.
प्रास्ताविक व सर्वांचा परिचय सचिव प्रदीप नागपूरकर यांनी करून दिला. संचालन योगीराज कोहचाडे, यांनी केले. आभार उषा साजापूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन काळे, गजानन नांदुरकर, मोतीराज मून, रवी धनकर, मनीष हिवंज, गौरव मेश्राम, अशोक येकेश्वर, मोहन वैरागडे, श्रृती कोहचाडे, अर्चना घ्यारे, नैतिक मून, केशव नक्षिणे, डॉ. मिलिंद मुळे, नरेंद्र पोहनकर, गजानन गिरोलकर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
व्यापारी, दलाल कधीच आत्महत्या करीत नाही
बहुतेक उद्योग हे शेतीवर चालतात. असे असतानाही उद्योजक, व्यापारी, दलाल हे कधीच आत्महत्या करीत नाही. पण ज्यांच्या जीवावर हे सर्व जगतात तो मात्र बिकट परिस्थितीत जीवन जगत असून प्रसंगी मरण पत्कारत आहे. प्रशासकीय व्यवस्था आणि राहकीय उसासीनता यामुळे ही परिस्थिती आल्याचे तिवारी यावेळी म्हणाले.