शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

फेसबुकवरून बदनामी करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 11:34 PM

फेसबुकवर बनावट अकाऊं ट तयार करुन त्यावर अश्लिल छायाचित्र प्रसारीत केले. त्यामुळे समाजात बदनामी झाली असून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागल्याची तक्रार करण्यात आली होती.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पती-पत्नीच्या व्हॉटस्अ‍ॅपवरून घेतले छायाचित्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : फेसबुकवर बनावट अकाऊं ट तयार करुन त्यावर अश्लिल छायाचित्र प्रसारीत केले. त्यामुळे समाजात बदनामी झाली असून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नागपुरातील एका युवकाला अटक केली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.श्रीकांत उर्फ स्वीकार कैलासराव उकीनकर (२७) रा. रामनगर, तेलंगखेडी, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फेसबुकवर बनावट अकाऊंटच्या सहाय्याने अश्लिल छायाचित्र अपलोड करुन बदनामी करीत असल्याची तक्रार २० सप्टेंबर २०१८ ला रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु करुन पोलीस निरिक्षक निलेश ब्राम्हणे यांनी एक विशेष पथक तयार केले. ते पथक नागपूरला पाठविण्यात आले. पथकाने आरोपीचा काम करीत असलेल्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तसेच त्याचे राहते ठिकाणी शोध घेतला असता तो काम करीत असलेल्या कार्यालयातच दिसून आला. त्याला विचारपूस केली असता कोणतीही कबुली दिली नाही. त्यामुळे पोलिसासोबत असलेल्या सायबर टिमने त्याच्या मोबाईल व गुगल अकाऊंटची पाहणी करुन विवादास्पद फोटो त्याच्या मोबाईल व गुगल अकाऊंटवर असल्याचे निष्पन्न केले. तसेच या तांत्रीक पुराव्याच्या आधारे आरोपीने हा गुन्हा केल्याचेही तपास पथकाने पटवून दिले. यावरुन आरोपी श्रीकांत उकीनकर याला अटक केली असून त्याच्याकडून १० हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल जप्त केला. आरोपीला पुढील तपासाकरिता रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधीकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, अशोक चौधरी, शहर पोलीस स्टेशनचे चंद्रकांत मदने यांच्या निर्देशाप्रमाणे निर्मला किन्नाके,सलाम कुरेशी,स्वप्नील भारव्दाज, कुलदीप टाकसाळे, अक्षय राऊत, दिनेश बोथकर, लोभेश गाढवे, निलेश कट्टोजवार, अनुप कावळे, जगदीश डफ, अभिजीत वाघमारे, प्रदीप वाघ यांनी केली.सायबर सेलची मुख्य भूमिकाया गुन्ह्याचा तपास तांंत्रीक स्वरुपाचा असल्याने सायबर सेलची मदत घेण्यात आली. आरोपीने फेसबुक अकाऊंट चालविताना वापरलेल्या सर्व तांत्रीक सेवा पुरविणाºया कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा करुन फेसबूक व आयडीया कंपनीकडून माहिती प्राप्त केली. त्यावरुन सदर फेसबूक अकाऊंट हे नागपूर येथील श्रीकांत उकीनकर नावाचा व्यक्ती वापरत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.त्यानुसार पुढील तपासाला गती मिळाली. या गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादी तसेच तिच्या पतीच्या व्हॉट्सअ‍ॅप व फेसबूक अकाऊंटवरुन फिर्यादीचे फोटो कॉपी केले व ते गुन्ह्यात वापरले. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करतांना आपल्या अकाऊंटची प्रायव्हसी सेटींग करुन घ्यावी, असे आवाहन सायबर सेलच्यावतीने करण्यात आले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस