शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र उमेदवारांची अस्तित्वासाठी तर राकाँची प्रतिष्ठेकरिता लढत

By admin | Updated: January 6, 2016 02:38 IST

येथील नगर परिषदेत पक्षविरोधी कारवाईमुळे सहा उमेदवार अपात्र ठरले होते. त्या जागांकरिता १० जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे.

सहा जागांकरिता ३० उमेदवार : सहाही जागा होत्या राकाँच्या ताब्यातभास्कर कलोडे हिंगणघाटयेथील नगर परिषदेत पक्षविरोधी कारवाईमुळे सहा उमेदवार अपात्र ठरले होते. त्या जागांकरिता १० जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी उमेदवार दाखल केले आहे. या सहाही जागा पहिले राकाँच्या ताब्यात असल्याने त्यांच्याकरिता या सहाही जागा प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. शिवाय पूर्वी राकाँच्या चिन्हावर निवडून येत पक्षविरोधी कारवाईने अपात्र ठरलेल्या पाच उमेदवारांनीही नामांकन दाखल केले आहे. या कारणाने ही निवडणूक सर्वांचे लक्ष वेधणारी आहे. येथील नगर पालिकेच्या आठ पैकी चार प्रभागातील सहा जागाची पोटनिवडणूक होवू घातली आहे. या निवडणुकीच्या रिंंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या ३० आहे. त्यांच्याकडून प्रचाराला गती आली असून निवडून येण्यासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर उमेदवारांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. अपात्र ठरलेले उमेदवार पूर्वी राकाँचे असल्याने त्याचा लाभ इतर पक्षांना होणार असल्याची चर्चा आहे. यामुळेच की काय येथे शिवसेना, काँग्रेस, बसपा व भाजपाच्यावतीने उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. ३३ सदस्य असलेल्या या नगर परिषदेच्या १२ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने गत सार्वत्रिक निवडणुकीत काबीज केल्या होत्या. पालिकेत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून गत अडीच वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. अशात २१ जुलै २०१४ ला झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाई केली. या विरोधात अ‍ॅड. कोठारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत सहा जणांना अपात्र ठरविल्याने ही निवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील सहाही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाने उमेदवार निवडणुकीचे रिंगणात उतरविले असून काँग्रेसचे दोन, बसपाचे दोन, शिवसेनेचा एक तर १३ अपक्ष उमेदवार रिंगणात उभे आहेत. सर्वाधिक उमेदवार प्रभाग सहामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये चार तर याच प्रभागतील ब गटात पाच उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ५ मध्ये चार उमेदवार आहेत. प्रभाग क्र. ६ मधे पाच तर याच प्रभागातील (ड) गटात चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. प्रभाग क्र. ७ मध्ये आठ उमेदवार आहेत. यामुळे ही पोटनिवडणूक अपात्र ठरलेल्या नगरसेवकांसाठी अस्तित्वाची तर राकाँसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे. या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.