शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वर्धा पालिकेला आली जाग

By admin | Updated: May 21, 2015 02:02 IST

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्याची जबाबदारी पालिकेची आहे.

वर्धा : पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्यांचा उपसा करून पाणी वाहून जाण्याकरिता त्या मोकळ्या करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असे असताना त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले. याची दखल घेत पालिकेच्या बांधकाम विभागाद्वारे शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली. वर्धा शहरातून तीन मोठे नाले वाहत आहेत. शहरातील छोट्या नालीतील पाणी या मोठ्या नाल्यात येते. यामुळे या नाल्यातील कचरा उपसण्याची गरज आहे. यंदा जून महिन्याच्या प्रारंभीलाच मान्सून धडकणार असल्याचे संकेत वेध शाळेने दिले आहे. त्या अनुशंगाने पालिकेच्यावतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करणे क्रमाप्राप्त असतानाही यासंदर्भातील उपाययोजनेसंदर्भात पालिकेत साधी बैठकही घेण्यात आली नव्हती.नालेसफाई व्हावी तसेच ही बाब शहरवासीयांच्या निदर्शनास यावी यासाठी लोकमतमध्ये ‘पावसाच्या तोडावर नाल्या तुंबलेल्याच’ आणि ‘शहरातील स्वच्छतेवर पालिकेची चुप्पी’ अश्या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच सुरू झालेल्या सफाईच्या कामांवरूनही ही बाब प्रत्ययास येत आहे. यासंदर्भात पालिकेतील संबंधित अधिकारी वर्गाला या बाबत विचारले असता पालिकेच्या पैशाची बचत करण्यासाठी पालिकेच्याच बांधकाम विभागाला नाले सफाईसंदर्भात पत्र देण्यात आले. त्यानुसार पालिकेतील सफाई कामगारांच्या सहकार्याने नालेसफाईला सुरुवात केली असून लवकरच काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. सध्या शहरातील मुख्य मार्गावरील नाल्यांच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. पावसापूर्वीच शहरातील सर्वच नाल्यांची सफाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सफाईकामांमुळे नाल्याही मोकळा श्वास घेत असल्याचे दिसते.(शहर प्रतिनिधी)