‘संस्कारात वाढलेली मी’ विषयावर सखींकरिता निबंध स्पर्धा
By Admin | Updated: May 17, 2014 23:50 IST2014-05-17T23:50:54+5:302014-05-17T23:50:54+5:30
लोकमत सखी मंच वतीने ‘संस्कारात वाढलेली मी’ या विषयावर आत्मनिवेदनपर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात निवड झालेल्या निबंधाकरिता आकर्षक बक्षीस दिली जाणार आहे

‘संस्कारात वाढलेली मी’ विषयावर सखींकरिता निबंध स्पर्धा
वर्धा : लोकमत सखी मंच वतीने ‘संस्कारात वाढलेली मी’ या विषयावर आत्मनिवेदनपर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात निवड झालेल्या निबंधाकरिता आकर्षक बक्षीस दिली जाणार आहे. आपण कशा प्रकारच्या वातावरणात संस्कारात वाढलो हे नेहमी आपल्याला सर्वांना सांगावेसे वाटते. संस्कारांचे, अनुभवांचे महत्त्व, त्यामुळे आयुष्यात झालेला बदल, जीवनात काहीतरी शिकवून गेलेले प्रसंग, असा खुप मोठा साठा सखींच्या मनात असतो. प्रत्येक वेळी ते व्यक्त करण्याची, बोलण्याची संधी मिळतेच असे नाही. मग हे व्यक्त होणं स्वत: पुरतंच मर्यादीत राहतं. सखींमध्ये लेखन कौशल्याचेही सुप्त गुण आहेत. ते सखी मंचच्या या त्यांच्या हक्काच्या व्यासपीठावर यावेत यासाठी फक्त सखी मंच सदस्यांकरिता सदर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सखींना आपला विषय हा सुमारे ४०० ओळीत मांडायचा आहे. निबंध घरूनच लिहून आणावयाचा असून लिहलेला निबंध एका बंद पाकिटात स्वत:चा नाव, पत्ता, फोन नं. व सखी मंच सदस्यता क्रमांक हा तपशील लिहून सखी मंच कार्यालयात २६ ते ३१ मे या कालावधीत आणून द्यायचा आहे. या स्पर्धेकरिता प्रवेश शुल्क प्रत्येकी २० रुपये असे आहे. सखींनी प्रवेश शुल्क आपल्या निबंधाबरोबरच कार्यालयात जमा करावयाचे आहे. यापैकी उत्कृष्ट निबंधास सखी मंच तर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निबंध हा स्वच्छ, सुटसुटीत, निटनेटका लिहलेला असावा. वाचनीय काही निबंधाचा उल्लेख व बक्षीस वितरण पुढील कार्यक्रमात रीतसर करण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्यांची नावे वर्तमानपत्रात जुन महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील. सखींना सदर स्पर्धेत सहभाग घेवून आपले लेखन कौशल्य यातून व्यक्त करावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीकरिता ९४२२९०४८६७ क्रमांकावर सकाळी ११ ते ५ या वेळात संपर्क साधावा.(उपक्रम प्रतिनिधी)