शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाचा बाजार

By admin | Updated: August 23, 2015 02:19 IST

शहराला लागलेला अतिक्रमणाचा शाप दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. यावर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन कुणीही उपायोजना वा कारवाई करीत नसल्यानेच हा प्रकार घडत आहे.

वर्धा : शहराला लागलेला अतिक्रमणाचा शाप दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. यावर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन कुणीही उपायोजना वा कारवाई करीत नसल्यानेच हा प्रकार घडत आहे. यात शहराचा श्वास मांत्र कोंडला जात असल्याचे दिसते. सध्या शहरातील अतिक्रमणात जागोजागी वाढच होत असल्याचे दिसते. बाजार ओळींमध्ये तर याचा कळसच गाठल्याचे चित्र आहे. भाजी बाजारासाठी लोकमान्य टिळक यांचा पुतळा असलेला परिसर देण्यात आला आहे; पण सध्या भाजीविके्रते आतमध्ये कमी आणि रस्त्यावरच अधिक दिसून येतात. यामुळे रस्ते निमूळते झाले असून परिसरातील अस्वच्छताही वाढीस लागली आहे. यात बाजाराची व्यवस्थाही कोलमडल्याचे दिसते.ंशहरातील लोकमान्य टिळक यांचा पुतळा असलेला भाजी बाजार गोल बाजार म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा परिसर भाजी बाजाराकरिता देण्यात आलेला आहे. टिळक पुतळा असलेल्या कुंपण केलेल्या भागातच बाजार भरावा, असा उद्देश होता; पण सध्या भाजीविक्रेते त्या परिसरात कमी आणि रस्त्यावरच अधिक दुकाने लावत असल्याचे दिसते. टिळक मार्केट परिसरामध्ये काही दुकाने लागलेली आहेत तर उर्वरित विक्रेते त्या जागेचा उपयोग केवळ माल ठेवण्याकरिता करीत असल्याचे दिसून येते. पुतळ्यासमोरील उर्वरित परिसरात चार चाकी बंड्या उभ्या केल्या जात असल्याचे दिसून आले. याच बंड्यांवर काही जुगारी, सट्टापट्टी व्यवसाय करणारेही दिसतात. शिवाय या बाजाराच्या सभोवतालच्या परिसरात अनेक दारूविक्रेतेही सक्रीय आहेत. यामुळे परिसरातील रहिवाश्यांना मात्र त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसते.टिळक मार्केटच्या बाहेर रस्त्यांवर दुकाने, चार चाकी बंड्या लावून भाजी तसेच फळ विक्रेते व्यवसाय करताना दिसतात. त्यांच्या पाठोपाठ अन्य वस्तूंचीही दुकाने रस्त्यावरच लावली जातात. यामुळे रस्ते अत्यंत निमूळते झाले आहेत. टिळक मार्केटच्या गेटजवळ असलेल्या झाडाच्याही पूढे दुकाने थाटली जातात. ही दुकाने रस्त्याच्या अगदी मधोमध येतात. यामुळे तेथून वाहने घेऊन जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार बाजारातील एक-दोन रस्त्यांवर असता तर त्याकडे दुर्लक्ष करता आले असते; पण बाजारातील प्रत्येकच ओळीमध्ये अतिक्रमण करून रस्त्यावर दुकाने थाटली जातात. यामुळे सामान्यांना ये-जा करताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्याकरिताही जागा शिल्लक राहत नाही. बाजारात गेल्यानंतर कुठेतरी एखाद्या ठिकाणी वाहने उभी करून संपूर्ण बाजार पायी पिंजून काढावा लागतो. अन्यथा वाहनांच्या गर्दीत ताटकळावे लागते. गोल बाजारातून सराफ लाईन, पत्रावळी लाईन व अन्य चौकांकडे जातानाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सराफ लाईन परिसरात रस्त्यापर्यंत दुकाने असून तेथेच वाहनेही उभी केली जातात. या परिसरात कुठेही पार्किंगसाठी जागा नाही. यामुळे नागरिकांची गोची होते.श्री राम मंदिर तसेच परिसरातील प्रत्येकच रस्त्यावर दुकाने असून ती अतिक्रमणात थाटण्यात आली आहेत. केवळ चार चाकी बंड्याच लावल्या नाही तर त्या कायम राहतील, अशी व्यवस्थाही अनेक विक्रेत्यांनी केल्याचे प्रत्यक्ष भेट दिल्यास लक्षात येते. एका बाजूला पक्की दुकाने आणि दुसऱ्या बाजूने अतिक्रमण करून थाटलेली दुकाने, यामुळे ये-जा करण्याकरिता रस्ताच शिल्लक राहत नाही. या प्रकारामुळे गोल बाजार तसेच परिसरातील प्रत्येक ओळींमध्ये गर्दीच दिसते. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.