शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कर्मचाऱ्यांचा संप मिटेना, लालपरी धावेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 5:00 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसातच हा संप पुकारल्याने महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा टप्प्याटप्प्यात बंद करण्यात आली. वर्धा आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केले. गेल्या २४ दिवसांपासून हा संप सुरू असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांचा रोष आणि अडचणी लक्षात घेता महामंडळाने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून २४ तासात रुजू होण्याच्या सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या मागणीकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. शासनाकडून वारंवार कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले जात आहे; पण, कर्मचारी संपावर कायम असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यासोबतच महामंडळालाही मोठा आर्थिक फटका  बसत आहे. यातून सध्यातरी काही तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने लालपरी अद्यापही आगारातच बंद झाली आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसातच हा संप पुकारल्याने महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा टप्प्याटप्प्यात बंद करण्यात आली. वर्धा आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केले. गेल्या २४ दिवसांपासून हा संप सुरू असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांचा रोष आणि अडचणी लक्षात घेता महामंडळाने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून २४ तासात रुजू होण्याच्या सूचना केल्या. पण, कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वर्धा विभागातील पाचही आगारामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या ६१ चालक-वाहकांपैकी ४९ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. यामध्ये ५ चालक तर ४४ वाहकांचा समावेश आहे. विभागीय कार्यालयाकडून सर्व ६१ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून किती जणांना नोटीस प्राप्त झाला, याची माहिती घेतली. नोटीस मिळाल्यानंतरही कर्मचारी कामावर रुजू न झाल्याने ४९ जणांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर उर्वरित १२ कर्मचाऱ्यांचीही येत्या दिवसात सेवा समाप्तीचे आदेश काढले जाईल, असे सांगण्यात आले. 

६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईदिवाळीच्या हंगामात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने महामंडळाने त्यांच्या महागाई व घरभाडे भत्त्याची मागणी लागलीच मान्य केली. पण, लगेच दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, ही मागणी घेऊन आंदोलन कायम ठेवल्याने लालपरीची चाके ठप्प पडली. प्रवाशांचे हाल आणि उत्पादनात होणारा तोटा लक्षात घेता, कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या. पण, कर्मचारी आंदोलनावर कायम  असल्याने सुरुवातीला पाचही आगारातील ६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

वर्धा विभागांतर्गत पाचही आगारामध्ये रोजंदारीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना १६ नोव्हेंबरला नोटीस बजावून २४ तासात कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या होत्या. पण, ते कर्मचारी कामावर रुजू झाले नसल्याने ४९ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले. उर्वरित १२ चालक-वाहकांना नोटीस मिळाली की नाही याची शहानिशा करून कारवाई केली जाईल.- चेतन हसबनीस, विभागीय नियंत्रक.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप