शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आर्वीत दोनशेवर शिक्षकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत.

ठळक मुद्देआयएलआय सर्वेक्षणातून कार्यमुक्त करा : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोविड-१९ इन्फ्लुएन्झा लाइक इलनेस (आयएलआय) सर्वेक्षण कामातून सर्व शिक्षकांना शासनाच्या पत्रान्वये तत्काळ कार्यमुक्त करावे या आशयाचे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना सर्व शिक्षकांनी सोमवारी दिले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्राचाही सर्व शिक्षकांनी निषेध केला.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत.महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षणातून शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करा, असे निवेदनात नमूद आहे.दुसऱ्या निवेदनात चार महिन्यांपासून कोविड-१९ संकट काळात राष्ट्रीय कार्य प्रामाणिकपणे पार पडत असूनही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी २१ ऑगस्ट २०२० च्या पत्रान्वये शिक्षकांनी केलेले कार्य मातीमोल झाले असल्याची संतप्त भावना शिक्षकांनी व्यक्त केली. याचा सर्व शिक्षकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला. हा आदेश त्वरित रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेश्रनिवासी उपजिल्हाधिकारी जोपर्यंत आदेश मागे घेत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करीत असल्याचेही शिक्षकांनी म्हटले आहे. यामुळे आर्वी शहरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकElgar morchaएल्गार मोर्चा