शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

अकरा गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

आष्टी तालुक्यामध्ये ११ गावांमध्ये या वर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा, बोरखेडी, चामला, ठेकाकोल्हा, कोल्हाकाळी, मुबारकपूर, किन्ही, मोई या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविहिरींच्या पाणी पातळीत घट : उन्हाळ्याच्या प्रारंभीत नदी-नाल्यांना कोरड

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यंदा वेळोवेळी झालेल्या पावसामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी वाढली होती. मात्र, उन्हाळ्याची चाहूल लागताच विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याचे बघावयास मिळत आहे. इतकेच नव्हे, तर तालुक्यातील ११ गावांवर पाणी टंचाईचे सावट आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.आष्टी तालुक्यामध्ये ११ गावांमध्ये या वर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा, बोरखेडी, चामला, ठेकाकोल्हा, कोल्हाकाळी, मुबारकपूर, किन्ही, मोई या गावांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रेडझोन, डार्क झोन, येलो झोन या तिन्ही झोनमध्ये विभागणी झालेल्या अवर्षणप्रवण गावांमध्ये पाण्याची समस्या भीषण निर्माण होणार आहे. थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गवळी बांधव आहेत. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करून ते कुटुंबाचा गाडा हाकतात. पण जनावरांसाठी चारा आणि पाण्याची कमतरता भासण्यास सुरूवात झाल्याने या गावातील जनावरांना दुसरीकडे न्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी समस्या आणखी भीषण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मोई गावासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले होते. या गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. आमदार दादाराव केचे यांनी सदर प्रश्न मार्गी लावला होता. मात्र, जि.प.कडून अद्याप या कामाची सुरुवात झाली नाही. त्यामुळे मोई गावालासुद्धा यावर्षी पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या गावातील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन विहीर आणि टाकीचे काम जलदगतीने होणे क्रमप्राप्त असताना अद्याप काम पूर्णत्वास गेलेले नाही.पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडेकिनी, मोई व मुबारकपूर या जंगलव्याप्त भागात अस्वल, वाघ, बिबट या वन्य प्राण्यांचा वावर असतो. अशातच पाण्याच्या शोधात वन्यप्राणीही गावाकडे येत असल्याचे वास्तव आहे. या गावांसह पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव येथे आवश्यक ठिकाणी बोअरवेल खोदण्याची गरज आहे.तीन दिवसांआड होतोय पाणी पुरवठासार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेअंतर्गत नियमित वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक गावांमध्ये दोन-तीन दिवसांत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. थार, बोरखेडी, बांबर्डा, चामला या गावांमधील संत्रा बागा आतापासूनच पाण्याअभावी करपत असल्याचे बघावयास मिळते. त्यामुळे संत्रा उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.पाणीटंचाई या विषयावर पंचायत समितीत आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी आढावा सभा घेण्यात आली. यामध्ये विविध उपाययोजना करण्यासंदर्भात जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सूचना दिलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली याचा आढावा आणखी घेतला जाईल. तसेच ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जास्त आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.- अनिल गावंडे, गटविकास अधिकारी, पं.स. आष्टी (शहीद).

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई