कंटेन्मेंट झोनमध्ये विद्युत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:24+5:30

परिसरातील नागरिकांवर १४ दिवस वॉच ठेवण्याकरिता पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासाठी तेथे मंडप उभारण्यात आले. या मंडपाकरिता लगतच्या विद्युत खांबावरुन डायरेक्ट विद्युत पुरवठा घेण्यात आल्याने महावितरणकडून कारवाई करीत गोंड प्लॉट, मालगुजारीपुरा तसेच गांधी नगर येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.

Electricity theft in the containment zone | कंटेन्मेंट झोनमध्ये विद्युत चोरी

कंटेन्मेंट झोनमध्ये विद्युत चोरी

ठळक मुद्दे कनेक्शन कापले : महावितरणच्या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मंडप उभारण्यात आले आहे. या मंडपाकरिता महावितरणकडून कोणतीही परवानगी न घेता थेट विद्युत पुरवठा घेतल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणकडून शहरातील तीन ठकाणचा विद्युत पुरवठा खंडीत केला. या कारवाईमुळे प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाल्यानी इतर ठिकाणच्या कारवाईला ब्रेक लागला.
शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्ण आढळून आलेला परिसर प्रतिबंधित केला जात आहे. त्या परिसरातील नागरिकांवर १४ दिवस वॉच ठेवण्याकरिता पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासाठी तेथे मंडप उभारण्यात आले. या मंडपाकरिता लगतच्या विद्युत खांबावरुन डायरेक्ट विद्युत पुरवठा घेण्यात आल्याने महावितरणकडून कारवाई करीत गोंड प्लॉट, मालगुजारीपुरा तसेच गांधी नगर येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. शहरातील मालगुजारीपुरा हा परिसर कंटेन्मेट झोन जाहीर केला असून या परिसरात महावितरणचे एक अधिकारी वास्तव्यास आहे. त्यांनाही १४ दिवस बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. यामुळे दुखावलेल्या या अधिकाऱ्यांची दृष्टी या अनधिकृत कनेक्शन पडल्याने त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिल्याची चर्चा मालगुजारीपुरा परिसरात रंगली आहे. त्यानंतर शहरातील इतरही ठिकाणी कारवाईला सुरुवात केली होती पण, ही कारवाई चर्चेचा विषय ठरल्यानंतर कारवाईला थांबा देण्यात आला. त्यामुळे ही कारवाई केवळ ‘अधिकारशाही’तून झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. पालिकेने डिमांड भरून या परिसरात विद्युत पुरवठा सुरू केला आहे.


कंटेन्मेट झोनची जबाबदारी शहरीभागात नगरपालिका तर ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. त्यामुळे शहरातील विद्युत कनेक्शनबाबत काय प्रकार घडला याची माहिती मागविली आहे. तसेच आता कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्यानंतर त्या परिसरात महावितरणने चार तासांत विद्युत पुरवठा करावा, असा आदेश पारित केला जाईल.
- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

Web Title: Electricity theft in the containment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.