वीज रोहित्र उठले नागरिकांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:17+5:30

शहरालगत म्हसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये काही दिवसांपूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले. यामुळे रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यालगत भागात साचते. येथेच वीज वितरण कंपनीचे रोहित्र आहे. या परिसरातील घरांना या रोहित्रावरून वीजपुरवठा होतो.

The electricity rohitra rises to the death of citizens | वीज रोहित्र उठले नागरिकांच्या जिवावर

वीज रोहित्र उठले नागरिकांच्या जिवावर

ठळक मुद्देखालीच साचते तळे : ज्ञानेश्वरनगरातील चित्र

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खुल्या जागेच पाणी साचते त्या ठिकाणी वीज वितरणचे रोहित्र असून यामुळे रहिवासी नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याकडे वीज वितरण कंपनी आणि म्हसाळा ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
शहरालगत म्हसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये काही दिवसांपूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले. यामुळे रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यालगत भागात साचते. येथेच वीज वितरण कंपनीचे रोहित्र आहे. या परिसरातील घरांना या रोहित्रावरून वीजपुरवठा होतो. रस्त्यालगत नालीचे बांधकाम न करण्यात आल्याने पाणी वाहून जात या खुल्या खोलगट जागेत साचते. मध्यंतरीच्या काळात संततधार पाऊस असल्याने तळ्यातील पाणी चक्क रोहित्रापर्यंत पोहोचले होते. हे पाणी रोहित्राच्या पेटीतही शिरले होते, असे येथील नागरिक सांगतात. ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडत आहे. साचणाऱ्या पाण्यामुळे वीजप्रवाहित होऊन १० ते १५ घरांना धोका होऊ शकतो.
मात्र, वीज वितरण कंपनी आणि म्हसाळा ग्रामपंचायत प्रशासनाची डोळेझाक होत आहे. रोहित्र इतरत्र हलवावे अथवा त्या खाली पाणी साचणार नाही या अनुषंगाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी ज्ञानेश्वरनगरातील रहिवासी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The electricity rohitra rises to the death of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज