शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

आयशर वाहनाची कारला जबर धडक; नववधुसह एक महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 6:06 PM

हा अपघात आजदा शिवारात २३ रोजी सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला.

ठळक मुद्देआजदा शिवारातील अपघात : जखमींवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू

वर्धा : पंक्चर दुरुस्ती करीत असताना अचानक मागाहून भरधाव आलेल्या आयशर वाहनाने कारला जबर धडक दिल्याने कारमधील नववधू आणि तिच्यासोबत बसून असलेली एक महिला गंभीररित्या जखमी झाली. हा अपघात आजदा शिवारात २३ रोजी सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला.

अश्विनी ओजवाल (२८) काजल पोट्टवार (२५) दोन्ही रा. वणी जि. यवतमाळ असे गंभीर झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

वणी येथील रहिवासी अश्विनी ओजवाल हिचा विवाह झाल्याने ती वराच्या कारने (एम.एच. १४ जे.एम. ७९०१) नागपूरच्या दिशेने जात होत्या. दरम्यान कारचा टायर पंक्चर झाल्याने कारमधील चालकासह वराकडील मंडळी कारखाली उतरली. मात्र, नववधू अश्विनी ओजवाल आणि तिची मैत्रिण काजल पोट्टवार या दोघी कारमध्येच बसून होत्या. टायर पंक्चर दुरुस्ती करीत असतानाच मागाहून भरधाव येणाऱ्या आयशर (टीएस. २६ टी. ९६३१) वाहनाने जबर धडक दिली. धडकेत कारचा चेंदामेंदा झाला.

अपघाताची माहिती मिळताच जामा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे, एएसआय भगत, पिसुड्डे, विनोद थाटे, किशोर लभाने, नागेश तिवारी, राहूल हुमरे यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ पाठाविले. कारखाली उतरलेली वराकडील मंडळी मात्र थोडक्यात बचावली.

अपघातात आयशर वाहन आणि कारचा चेंदामेंदा झाल्याने काही वेळ दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना हायड्राच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती समुद्रपूर पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे. वृत्तलिहेस्तोवर वराचे नाव तसेच इतरांची नावे कळू शकली नाही.

टॅग्स :Accidentअपघात