लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.सर्वच खासगी अनुदानित शाळेमध्ये कला शिक्षक कार्यरत आहे. पण मुख्याध्यापकांच्या उदासीन धोरणामुळे अनेक कला शिक्षकांवर शाळां शाळां मध्ये अन्याय होत आहे.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, महामंडळ वर्धा जिल्हा सरचिटणीस आशिष पोहाणे व अध्यक्ष मोहन तवले यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी पारधी यांच्याशी चर्चा करण्यात आली. पुढील प्रश्न मार्गी काढू तसे परिपत्रक काढण्याचे आश्वासन पारधी यांनी दिले.निवेदनामध्ये कला शिक्षकांना प्रथम कला व कार्यानुभव हेच विषय देऊन त्यांच्या विषयाचा कार्यभार शिकविण्यास द्यावा. कला शिक्षकास वर्कलोड देऊनही जर तासिका पूर्ण होत नसल्यास कला शिक्षकास गणित, इंग्रजी, मराठी, विज्ञान हे विषय वगळून इतर विषय आवश्यक वाटल्यास द्यावे. इयत्ता नववी व दहावी वर्गांना कला रसास्वाद विषय कला शिक्षकांना अध्यापनास देण्याचा संदर्भास सुचना निर्गमित कराव्या., नवीन बदललेल्या तासिका वितरणाप्रमाणे वेळापत्रक कला कार्यानुभव तासिकाची अमंलबजावणी करुन सुधारित वेळापत्रक शाळांनी तयार करण्यात शाळांना आदेश करावे, असे न करणाऱ्या शाळेवर कार्यवाही करावी., ए.टी.डी. ए.एम. वेतनश्रेणीचे प्रलंबित सादर प्रस्ताव प्रकरणे तात्काळ मार्गी लावून त्यासंबंधी शिक्षकांना त्यांनी आर्ट मास्टर (ए.एम.) वरिष्ठ शैक्षणिक पात्र केल्याचा दिनांक पासून विना अट प्रस्ताव नियमानुसार मंजुर करण्याची कार्यवाही करावी. निवेदन देतांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे,महेंद्र सालंकार , एस.एस.पुसाम, व्ही.टी. खंडारे, सावरकर, शेंदरे, एस. एस.सिर्सीकर, आर.टी. महाजन, एम. एस. बरडे, पी.एन.निखारे, ए.बी. दहापुते, उकेकर, बंसी, बाचले,.बोरकर, जाधव, भातकुलकर, बाळसराफ व बर्व उपस्थित होते.
कला शिक्षकांच्या समस्येबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:34 IST
जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सर्वच खासगी अनुदानित शाळेमध्ये कला शिक्षक कार्यरत आहे. पण मुख्याध्यापकांच्या उदासीन धोरणामुळे अनेक कला शिक्षकांवर शाळां शाळां मध्ये अन्याय होत आहे.
कला शिक्षकांच्या समस्येबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
ठळक मुद्देपरिपत्रक काढण्याचे आश्वासन : अडचणींवर झाली चर्चा