शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भंगार विक्रीतून ९०.६१ लाखांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:00 AM

राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाने भंगार विक्रीतून ९०.६१ लाखांची कमाई केली आहे. याबाबतचा लिलाव २० फेब्रुवारीला ई-टेंडरींग पद्धतीने झाला.

ठळक मुद्देनवीन साहित्य घेण्यासाठी मदत होणार : अपेक्षेपेक्षा मिळाले साडे पाच लाख जादा

ऑनलाईन लोकमतवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाने भंगार विक्रीतून ९०.६१ लाखांची कमाई केली आहे. याबाबतचा लिलाव २० फेब्रुवारीला ई-टेंडरींग पद्धतीने झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला या भंगार विक्रीच्या लिलावामुळे नवीन साहित्य खरेदीसाठी मदत होणार असल्याचे रापमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सध्याच्या स्पर्धेच्या युगात खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत राज्य परिवहन महामंडळ कुठेही मागे पडू नये म्हणून दिवसेंदिवस नवनवीन प्रयोग केले जात आहेत. वातानुकूलीत असलेली शिवशाही बस सेवा हा त्यातीलच एक भाग असल्याचे सांगितले जाते. एकूणच बदलत्या युगाप्रमाणे रापम योग्य सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. जून्या काही बसेस, टायर, बॅटरी व रापमच्या कुठल्याही कामात न येणारे इतर साहित्य गत काही महिन्यांपासून रापमच्या विभागीय कार्यशाळेत धुळ खात होते. ते विक्री करण्याचे निश्चित करीत त्याबाबत ई-निविदा प्रक्रियेद्वारे रितसर आवेदन मागविण्यात आले. सदर भंगार विक्री प्रक्रियेत रापमच्या वर्धा विभागाने एकूण १२५ वस्तू विक्रीकरिता ठेवल्या होत्या. त्यापैकी १२३ वस्तूंची विक्री झाली आहे.या भंगार विक्रीतून रापमच्या वर्धा विभागाला ८५ लाख रुपये येणे अपेक्षीत होते;पण प्रत्यक्ष लिलावादरम्यान सदर भंगाराला ९० लाख ६१ हजार ६७८ रुपयांमध्ये विकण्यात आले आहे. अपेक्षेपेक्षा सुमारे साडे पाच लाख जादाचेच भंगार विक्रीतून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला प्राप्त झाले आहे. भंगार विक्रीतून प्राप्त रक्कम नवीन साहित्य खरेदीसाठी फायद्याची ठरणार आहे.बसेससह टायर व बॅटºयांच्या विक्रीतून सर्वाधिक मिळकतरापमच्या वर्धा विभागाने त्यांच्या कुठल्याही कामात न येणाºया १० मोठ्या बसेस, ५ छोट्या बसेस, १ हजार ५५० टायर, ९०० बॅटऱ्या विक्रीतून सर्वाधिक मिळकत प्राप्त केली आहे.पुणे येथील एका कंत्राटदाराच्या माध्यमातून लिलाव घडवून आल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भंगार कमी असले तरी यंदाच्या वर्षी भंगाराला चांगले दर मिळाले आहे.बॅटरी मागे ३०० तर टायर मागे ५५ रुपये मिळविले जास्तप्रत्येक बॅटरीला ३ हजार २०० तर प्रत्येक टायरला ३०० रुपये रापमच्या वर्धा विभागाला मिळणे अपेक्षीत होते. प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेदरम्यान प्रत्येक बॅटरी मागे ३०० तर टायर मागे ५५ रुपये जास्त मिळाल्याचे रापमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रक्रियेमुळे नवीन साहित्य खरेदीकरण्यासाठी मदत होणार असल्याने भंगार विक्री प्रक्रिया रापमच्या वर्धा विभागासाठी फायद्याची ठरली आहे.भंगार विक्रीतून मोठी कमाई रापमच्या वर्धा विभागाची झाली आहे. नवीन साहित्य मिळविण्यासाठी ही मदतगार ठरणार आहे.- राजेश अडोकार,विभाग नियंत्रक,रा.प.म. वर्धा.