शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

कमाईत वर्धेची एसटी विभागात अव्वल

By admin | Updated: May 16, 2016 02:14 IST

प्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरत राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने सेवा देण्यात येत आहे. एसटीचे जाळे गावखेड्यापर्यंत पोहोचले आहे.

प्रतिदिन २७ लाखांचे उत्पन्न : ३०० बसगाड्यांतून एक लाख किमीचा प्रवास रूपेश खैरी  वर्धाप्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरत राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने सेवा देण्यात येत आहे. एसटीचे जाळे गावखेड्यापर्यंत पोहोचले आहे. या जाळ्यातून झालेल्या प्रवासात यंदाच्या आर्थिक वर्षात विदर्भातील नागपूर विभागातून वर्धा अव्वल तर विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्धेने या आर्थिक वर्षात ४ कोटी ७० लाख १४ हजार रुपयांची कमाई केली. असे असले तरी वर्धेतून भंगार बसगाड्यातूनच प्रवासी सेवा देण्यात येत आहे.२०१४-१५ या आर्थिक वर्षात वर्धा आगाराला सुमारे १ कोटी ७६ लाख रुपयांनी तोटा आला होता. ते नुकसान भरून यंदाच्या आर्थिक वर्षांत या आगाराने ४.७० कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. एवढेच नाही तर असलेल्या सुविधांचा वापर करून नफा कमविणारा वर्धा जिल्हा नागपूर विभागात पहिला व विदर्भात दुसरा ठरला आहे. वर्धा जिल्ह्यात आजच्या घडीला ३३० बसगाड्या आहेत. यातील ३०० गाड्या एका दिवसाला १ लाख किलोमिटरचे अंतर कापत आहे. या अंतरातून दिवसाकाठी २७ लाख रुपयांचा नफा होत असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. विदर्भात पहिल्या क्रमांकावर अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा आहे. अमरावती विभागातील बुलडाणा जिल्हा वगळता अकोला, यवतमाळ अमरावती या आगारांना नुकसान सहन करावे लागले आहे. नागपूर विभागातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली या आगारांना नफा झाला; मात्र तो वर्धेपेक्षा कमीच आहे. तर नागपूर आणि चंद्रपूर आगार यंदाच्या आर्थिक वर्षात तोट्यात आल्याचे दिसून आले आहे. या आगारांकडे मार्च २०१५ ते एप्रिल २०१६ या काळात प्रवाश्यांनी पाठ दाखविल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी नागपूर विभागच नाही तर संपूर्ण राज्यात एसटीच्या भंगार गाड्यांतूनच प्रवाश्यांना सेवा देण्यात येत असल्याचे वास्तव आहे.