पंक्चर दुरुस्ती करणाऱ्याचे ‘टाकाऊ’ वस्तूंमधून ‘टिकाऊ’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:00 AM2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:22+5:30

दाबीर शेख हे वीस वर्षापूर्वी मोठ्या भावासोबत कारंजा शहरात आला. कुटुंबासोबत राहत असताना त्याने आपला वडिलोपार्जीत पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. या दरम्यान कारंजा नगरपंचायतच्यावतीने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण अभियानाचे त्याने बारकाईने अवलोकन केले. आपल्या या पारंपरिक व्यवसायातून वाया जाणाऱ्या टायर-ट्युबपासून या शासकीय उपक्रमाला हातभार लावता येईल का?

A 'durable' campaign from the puncture repairman's 'waste' items | पंक्चर दुरुस्ती करणाऱ्याचे ‘टाकाऊ’ वस्तूंमधून ‘टिकाऊ’ अभियान

पंक्चर दुरुस्ती करणाऱ्याचे ‘टाकाऊ’ वस्तूंमधून ‘टिकाऊ’ अभियान

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छतेसह वृक्षारोपणास प्रोत्साहन : टायरपासून बनवितोय वृक्ष व कचराकुंड्या, नजर पडताच नागरिक पडतात मोहात

अरूण फाळके।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : एखाद्या सामान्य माणसाने, सामाजिक जाण ठेवून मनावर घेतले तर तो शासकीय उपक्रम उत्तम प्रकारे राबवू शकतो, आणि पाहता पाहता तो समाजाचा कौतुकाचा आणि आदर्शाचा विषय ठरू शकतो. याचा प्रत्यय कारंजा बसस्थानक परिसरात टायर पंक्चर दुरुस्तीचे काम करणाºया मोहम्मद दाबीर शेख यांच्या बाबतीत आला. आपल्या कल्पकतेने टाकाऊ टायरपासून विविध आकाराच्या वृक्ष कुंड्या व कचरा कुंड्या बनवून ते स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियानाला प्रोत्साहन देत आहे.
दाबीर शेख हे वीस वर्षापूर्वी मोठ्या भावासोबत कारंजा शहरात आला. कुटुंबासोबत राहत असताना त्याने आपला वडिलोपार्जीत पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. या दरम्यान कारंजा नगरपंचायतच्यावतीने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण अभियानाचे त्याने बारकाईने अवलोकन केले. आपल्या या पारंपरिक व्यवसायातून वाया जाणाऱ्या टायर-ट्युबपासून या शासकीय उपक्रमाला हातभार लावता येईल का? याचा विचार करु लागले. त्यातून त्यांना टाकाऊ टायरट्युबच्या तुकड्यांपासून कचरा कुंड्या व झाडे लावण्यासाठी वृक्ष कुंड्या तयार करण्याची संकल्पना सुचली. आजच्या घडीला त्यांनी वाया गेलेल्या टायरट्युबपासून बदक, बगळा, मोर, हत्ती, कासव, उंट, कावळा, चिमनी, कमळ यासह सायकलच्या आकाराच्या आकर्षक कचराकुंड्या व वृक्षकुंड्या बनविल्या आहेत. यासर्व कुंड्यांना विविध रंग देवून त्यात झाडे लावली आहे. जवळपास दीडशेच्यावर असलेल्या या कुंड्यांची दुकानाच्या बाजुलाच सुंदर अशी मांडणी करण्यात आली आहे. या कुंड्या अनेकांच्या नजरेत भरत असून त्या विकत घेण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. त्यामुळे रस्त्याने येणारे-जाणारे या कुंड्याही खरेदी करीत आहे. त्यामुळे दाबीर शेख यांच्या संकल्पनेने अभियानालाला प्रोत्साहन मिळण्यासोबत त्यांना वेगळा रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांचा छंदही जोपासल्या जात असल्याने त्यांना वेगळे समाधान लाभत आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार
महम्मद दाबीर शेख यांच्या या अनोख्या उपक्रमाची आणि अभियानातील सहकार्याची कारंजा नगरपंचायतने दखल घेतली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सद्या कारंजा शहरात मोहम्मद दाबीर शेख यांच्या या आकर्षक कलाकृतीची आणि विधायक मनोवृत्तीची सर्वत्र चर्चा आहे.

परगावातही कुंड्यांची मागणी वाढली
एक सामाजिक भान ठेवून दाबीर शेख यांनी विठ्ठल टेकडी परिसरात ११ झाडांच्या कुंड्या व २ कचऱ्या कुंड्या दान दिल्यात. दाबीर शेख यांच्या या आकर्षक कुंड्या आता अमरावती, अकोला, आर्वी, तळेगाव, आष्टीतही पोहोचल्या आहेत. अनेकांना भूरळ घालणारी ही कलाकृती सर्वपरिचित होत असल्याने कुंड्यांची मागणीही वाढत आहे.

Web Title: A 'durable' campaign from the puncture repairman's 'waste' items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.