अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कपाशीवर लाल्या

By Admin | Updated: December 18, 2014 22:59 IST2014-12-18T22:59:30+5:302014-12-18T22:59:30+5:30

जिल्ह्यात दोन लाखांवर पेरणीक्षेत्र असणाऱ्या कपाशीवर प्रतिकुल हवामान व अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे कोकडा व लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पाण्याचा निचरा न झालेल्या शेतामधील कपाशी

Due to the shortage of nutrients, they are put on cotton | अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कपाशीवर लाल्या

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कपाशीवर लाल्या

विरूळ (आकाजी) : जिल्ह्यात दोन लाखांवर पेरणीक्षेत्र असणाऱ्या कपाशीवर प्रतिकुल हवामान व अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे कोकडा व लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पाण्याचा निचरा न झालेल्या शेतामधील कपाशी पिवळी पडली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. येथील डॉ. प्रकाश चाफले गत वर्षी एकरी १५ ते १६ क्विंटल कापसाचे उत्पन्न घेतले; मात्र यावर्षी त्यांनी १२ एकर कपाशीत एकरी ५० किलो कापूस झाल्याने यावर्षी नापिकीची भीषणता लक्षात येते.
परिसरातील मध्यम पोत असलेल्या जमिनीत कपाशीवर दुराडा रोगाचे आक्रमण झाले. याचे रूपांतर लाल्या रोगात झाले आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून पऱ्हाटी वाळत आहे. रसशोषण करणाऱ्या किडीमुळे लाल्या रोग येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)
लाल्या रोगाचे कारण
रात्रीचा गारवा दिवसा वाढत असलेले तापमान या प्रतिकुल हवामानामुळे अन्नद्रव्याची कमतरता भासते. यामध्ये प्रामुख्याने मॅग्नेशियम आणि नत्र या मुलद्रव्यांची कमतरता दिसून येते. यामुळे अ‍ॅथोसायसिंग होऊन पाने लाल होतात.
कापसाचा दर्जा खालावतो
कापूस फुलावर येत असताना पाने लाल झाली तर उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे पीक फुलावर असताना काळजी घेणे आवश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास निकृष्ठ व दर्जाच्या रूईचे उत्पादन होते. बोंडे पूर्णत: उघडत नाही. त्यामुळे सरासरी उत्पादनात घट येते

Web Title: Due to the shortage of nutrients, they are put on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.