लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षी गत काही दिवसांपासून वरुणराजा रुसल्याचे बघावयास मिळत आहे. येत्या दोन दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास पाण्याअभावी जिल्ह्यातील सुमारे ४.१५ लाख हेक्टर कोरडवाहू क्षेत्रावरील पीक करपण्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ३ हेक्टरवर धान, ६६३ हेक्टरवर ज्वारी, ६२ हेक्टरवर मका, ६२ हजार ८८२.५ हेक्टरवर, मुग २८२ हेक्टरवर, उडीद २५१ हेक्टरवर, भुईमुंग ४५७ हेक्टरवर, सोयाबीन १ लाख १५ हजार ६७९ हेक्टरवर तर २ लाख १९ हजार ५ हेक्टर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण सुमारे ५ लाख ५६ हजार हेक्टरपैकी केवळ १ लाख ४१ हजार हेक्टरवरच ओलिताची सोय आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ज्या शेतकºयांकडे ओलिताची सोय आहे ते शेतकरी योग्य निगा घेतल्याने बºया पैकी वाढ झालेले पीक वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोयच नाही त्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील तूर, कपाशी, सोयाबीन पीक करपण्यास सुरूवात होईल, असे सांगितले जात असून यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.कपाशी व तूर पीक दमधरूनजिल्ह्यात ओलिताच्या शेतजमिनीच्या तूलनेत कोरडवाहू शेतजमिनीचे क्षेत्र जास्त आहे. गत काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला असला तरी सध्यास्थितीत कपाशी व तूर पीक दमधरूनच आहे. येत्या चार-पाच दिवसात पाऊस न झाल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील हे उभे पीक करपण्यास सुरूवात होईल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात.सोयाबीन पीक हातचे जाण्याची भीतीयंदा १ लाख १५ हजार ६६९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सध्यास्थितीत हे पीक फुलावर असून येत्या दोन दिवसात जोरदार पाऊस होत या पिकाला पुरेसे पाणी न मिळाल्यास फुलगळतीला सुरूवात होईल. शिवाय पावसाचा खंड त्यापेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील सोयाबीन पीक बळीराजाच्या हातचे जाईल, असे बोलले जात आहे.काळीची शेत जमीन असलेल्या शेतात सध्या ओलावा कायम आहे. परंतु, मुरमाड शेतजमिनीत ओलावा पाहिले तसा नसल्याचे दिसून येते. येत्या दोन दिवसात पाऊस न आल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची फुलगळती सुरू होत हे पीक करपण्यास सुरूवात होईल, अशी स्थिती आहे. पावसाचा खंड काही दिवस कायम राहत कडक ऊन तापल्यास तूर, कपाशी, सोयाबीन आदी पीक करपण्यास सुरूवात होईल. येत्या काही दिवसात जोरदार पाऊसाची आशा असून तसा हवामान खात्याचा अंदाज आहे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
पावसाअभावी ४.१५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:27 IST
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षी गत काही दिवसांपासून वरुणराजा रुसल्याचे बघावयास मिळत आहे.
पावसाअभावी ४.१५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका
ठळक मुद्देसोयाबीन पीक अडचणीत : बळीराजावर अस्मानी संकट