सिंचन प्रकल्पामुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाला गती

By Admin | Updated: December 16, 2014 22:57 IST2014-12-16T22:57:27+5:302014-12-16T22:57:27+5:30

निम्न वर्धा, आजनसरा, लाल नाला आदी सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी सलगरितीने पाणी पोहचविण्यासाठी पाटचऱ्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासोबतच

Due to the irrigation project, the rehabilitation of affected villages is in progress | सिंचन प्रकल्पामुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाला गती

सिंचन प्रकल्पामुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाला गती

मुख्यमंत्र्यांची माहिती : विधान भवनात जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा
वर्धा : निम्न वर्धा, आजनसरा, लाल नाला आदी सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी सलगरितीने पाणी पोहचविण्यासाठी पाटचऱ्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासोबतच अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी वर्धा जिल्ह्याच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत दिल्यात.
विधान भवन येथे वर्धा जिल्ह्यातील सिंचन, कृषी, वीज तसेच दळणवळण आदी विभागांचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार रणजित कांबळे, डॉ. पंकज भोयर, कुणावार, उर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अजय मेहता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव के.पी. बक्षी, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव विवेक नाईक, जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, मुख्य अभियंता अजित सगणे आदी उपस्थित होते. सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच वन जमिनीमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
गांधी फॉर टुमारो प्रकल्पाला गती
४९५ कोटी रूपये खर्चाचा सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत कंव्हेंशन सेंटर व आश्रमाच्या परिसरातील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यईल. पहिल्या टप्प्यात १४ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रधान करण्याच्या सूचना दिल्यात.(जिल्हा प्रतिनिधी)
रस्त्यांच्या कामांची तपासणी करणार
पथकामार्फत तपासणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वर्धा शहरातील रेल्वे उड्डाण पुलाचे रूंदीकरण नागपूर-बोरी-तुळजापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तसेच सिंदी गावाजवळ नवीन रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. कृषी पंपांना वीज जोडणीच्या कार्यक्रमाअंतर्गत आॅक्टोबर अखेरपर्यंत ४ हजार ७७ प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या मार्च १६ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. जिल्ह्यात नादुरूस्त झालेले ४०९ रोहित्रे बदलविली असून इंन्फ्रा २ योजनेंतर्गत विद्युत सुधारण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविले जात असल्याचे उर्जा विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी सांगितले.

Web Title: Due to the irrigation project, the rehabilitation of affected villages is in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.