वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते झाले अरूंद
By Admin | Updated: February 26, 2015 01:15 IST2015-02-26T01:15:22+5:302015-02-26T01:15:22+5:30
शहरातील मुख्य मार्गावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. बाजार मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी, बॅँकेत व्यवहारासाठी येणाऱ्या ग्राहकांना

वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते झाले अरूंद
सेलू : शहरातील मुख्य मार्गावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. बाजार मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी, बॅँकेत व्यवहारासाठी येणाऱ्या ग्राहकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ग्राहकांची होत असलेली गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी या भागात येणाऱ्या नागरिकांना करावी लागत आहे.
येथील बाजार मार्गावर बॅँक आॅफ इंडियात ग्राहकांची वर्दळ असते. बाजारओळीत ही बॅँक असल्याने रस्त्याच्या दुतर्फा या मार्गावर नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतो. पार्किंगची व्यवस्था नसल्याने नाइलाजास्तव ग्राहकांना भर रस्त्यावर वाहने उभी ठेवावी लागतात. परिणामी, किरकोळ अपघातसुध्दा घडतात. येथे कोणतीही सुरक्षायंत्रणा नसल्याने वाहन चोरीच्या घटना सुध्दा घडल्या आहेत. बॅँकेत येणाऱ्या ग्राहकांना वाहन ठेवण्यापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय बाजारात येणाऱ्या नागरिकांनाही या वाहनांच्या रांगाचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलीस विभागाच्यावतीने लक्ष देत वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी या भागात येणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर येथे घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)