वाहन चालविण्याच्या परवान्याला लागले सव्वा वर्ष
By Admin | Updated: May 29, 2014 02:42 IST2014-05-29T02:42:28+5:302014-05-29T02:42:28+5:30
‘शासकीय काम अन बारा महिने थांब’ या उक्तीचा परिचय उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे

वाहन चालविण्याच्या परवान्याला लागले सव्वा वर्ष
आष्टी (श.) : ‘महाराष्ट्र शासन शिकाऊ वाहन चालक’ या हेडखाली ८७ रुपये ३0 पैसे आकरण्यात आलेत. या शुल्काचीही पुर्तता त्यांनी केली. यानंतर संबंधित अधिकार्यांनी महिनाभरात गाडी चालविण्याचा परवाना मिळून जाईल, असे सांगितले. आपला परवाना आज ना उद्या येईल, या आशेवार सागर यांनी दिवस काढलेत. प्रत्येक महिन्याला कार्यलयास भेट देऊन विचारणा केली. त्यावर होकार मिळत होता; पण प्रत्यक्षात परवाना मिळण्याची कुठलीच आशा दिसली नाही.