शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१०० रुपयांत वर्षभर दारू प्या! पाच महिन्यांत ४३६ जणांनी काढले दारू पिण्याचे लायसेन्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:22 IST

Wardha : उत्पादन शुल्क विभागाला ३९ हजार रुपयांचा महसूल झाला प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्हा दारूबंदी आहे. मात्र, तरीही जिल्ह्यालगतच्या वाईन शॉपवर दिवसभर मुंग्यांसारखी गर्दी असते. प्रत्यक्षात, परवाना काढून 'लिमिट' मध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसूल कमी मिळतो. दारू पिण्यासाठी दारूबंदी जिल्ह्यात लायसेन्स काढणाऱ्यांची आकडेवारी पाहिल्यास जिल्ह्यात जानेवारी ते मेदरम्यान पाच महिन्यांत ४३६ जणांनी दारूसेवनाचे परवाने काढले. याशिवाय वर्षभर दारू पिण्याचा आणि एक दिवसाचा परवाना काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दारू खरेदी करणाऱ्यांपैकी ९० टक्के नागरिकांकडे परवानाच नसतो.

परवाना काढल्यावरही या अटींचे पालन आवश्यकपरवाना मिळाल्यानंतर, ज्या परवान्यासाठी अर्ज केला आहे, त्या संबंधित सर्व नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. परवान्याची वैधता संपण्यापूर्वी, त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. जर परवान्याच्या अटींमध्ये काही बदल झाले, तर ते बदल स्वीकारणे आणि त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.

मद्य परवानाधारकांनाही सवलतमद्य परवानाधारकांना खरेदी-विक्री करताना काही सवलती मिळतात. तसे पाहता जिल्ह्यात दारू खरेदी करणाऱ्या २० टक्के लोकांकडे परवाना नसतोच.

कोणाकडून दिला जातो मद्य परवाना ?राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonlin e.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. त्या ठिकाणी सर्व्हिसेसची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला कुठला परवाना पाहिजे, ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करायचा आहे. डिजिटल फोटो आणि सही, ओळखपत्र (आधार कार्ड, व्होटर आयडी), रहिवासी दाखला आवश्यक असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

१०० रूपयांत वर्षभर दारू पिण्याचा परवानामहाराष्ट्रात दारू पिण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. एक दिवसाचा ५ रुपये, वर्षाचा १०० रुपये, तर आजीवन परवाना एक हजार रुपयांमध्ये मिळतो. परवाना नसल्यास, दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. पहिल्या गुन्ह्यासाठी तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

किती वर्षांवरील व्यक्तींना मिळतो परवानावर्षभर दारू पिण्याचा आणि एक दिवसाचा परवाना काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये दारू पिण्यासाठी कायदेशीर वय २५ वर्षे आहे. याचा अर्थ असा की, २५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनाच दारू पिण्याचा परवाना मिळतो. वयाची २१ वर्षे पूर्ण केली असतील तर बिअर किंवा ब्रिझरचे सेवन करण्याचा परवाना मिळतो.

दारूच्या परवान्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र हवेपरवाना एका दिवसाचा, एका वर्षाचा किंवा आयुष्यभराचाही असू शकतो. तो मिळवण्यासाठी वैद्यकीय अहवालाची आवश्यकता असते. शरीराला मद्यसेवनाची गरज असल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला असेल, तर परवाना दिला जातो. 

टॅग्स :wardha-acवर्धाalcohol prohibition actदारुबंदी कायदा