लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दातांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात होणारा खर्च विविध प्रकारच्या उपचारांवर आणि रुग्णालयाच्या प्रकारावर अवलंबून असतो. रुट कॅनलसारख्या उपचारासाठी वर्धा शहरामध्ये ५ हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. दात काढण्यासाठी दीड हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत खर्च होत असल्याने रुग्ण हा खासगी रुग्णालयापेक्षा सरकारीकडे धाव घेतो. पण, या ठिकाणी लागणार वेळ लक्षात घेता ते सावंगीच्या रुग्णालयात जात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्ध्यात जिल्हा सामान्य रुग्णालय असून येथे दंत विभाग आहे. येथे तपासणी व उपचाराकरिता ग्रामीणसह शहरी भागातीलही रुग्ण सकाळपासून येतात. मात्र, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व जटिल उपचाराकरिता अनेक दंत रुग्ण दाताच्या खासगी रुग्णालयात किंवा सावंगीच्या रुग्णालयात जात असल्याचे वास्तव आहे. उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालयात लगेच शस्त्रक्रिया होत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक दंतरुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात जात असल्याचे दिसून येत आहे. पंरतु त्याचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे.
खासगीच्या ओपडीत दिसतात अनेक रुग्ण
- वर्ध्यात दाताचे अनेक खासगी रुग्णालये आहेत. यामध्ये दररोज दंत रुग्ण तपासणी,
- औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. यामुळे काही रूग्ण सकाळपासून दिसतात.
दंत उपचाराचा खर्च किती ?रुट कॅनल - ३,५०० ते ५,००० रुपयेदात काढणे - १,५०० ते १०,००० रुपयेदंत प्रत्यारोपण - ३५,००० ते ४५,००० रुपयेदात पांढरे करणे - ८,००० ते ९,००० रुपयेदात स्केलिंग - १,५०० ते ५००० रुपयेजबडा सुस्थितीत करणे - १५,००० ते २५,००० रुपये
शासकीय रुग्णालयातही दररोज येतात दंतरुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयातील दंत विभागात दररोज ओपीडीमध्ये जवळपास १५ ते २० रुग्ण तपासणी व उपचारासाठी येत असतात. येथे केवळ दात दुखणे, दात स्वच्छ करून घेणे व इतर किरकोळ उपचारासाठी ग्रामीण भागातील रुग्ण येतात असे सांगीतले.
"अलीकडे दंतरुग्णांचे प्रमाण वाढले आहे. दंत रुग्णांना कोणताही त्रास किंवा वेदना होत असल्यास संबंधितांनी लागलीच रुग्णालय गाठून तपासणी व उपचार करून घेतले पाहिजे. उपचारासाठी जेवढा विलंब होईल, तेवढाच त्रास आणखी वाढत जातो."- डॉ. आशिष जयस्वाल, दंत चिकित्सक, वर्धा.