शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कार्याला लावला रक्तदात्यांनी हातभार

By admin | Updated: July 2, 2014 23:23 IST

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे़ शिवाय राष्ट्रीय कार्य म्हणूनही रक्तदानाकडे पाहिले जाते़ आपण कुणासाठी काही करू शकतो, या भावनेतून केलेले रक्तदान तुमच्या अजाणतेपणी कुणाचे तरी जीवन वाचविण्याचे काम

श्रद्धेय जवाहरलाल दर्डा जयंती : रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसादवर्धा : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे़ शिवाय राष्ट्रीय कार्य म्हणूनही रक्तदानाकडे पाहिले जाते़ आपण कुणासाठी काही करू शकतो, या भावनेतून केलेले रक्तदान तुमच्या अजाणतेपणी कुणाचे तरी जीवन वाचविण्याचे काम करते़ याच भावनेतून रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्याला रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे हातभार लावला़ लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लाईफ लाईन रक्तपेढीच्या सहकार्याने बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत न्यू आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले़ शिबिराचे उद्घाटन न्यू आर्टस् कॉमर्स व सायन्सचे प्राचार्य कडवे यांच्या हस्ते करण्यात आले़ विज्ञान कितीही पुढे गेले, निर्मितीमध्ये विलक्षण प्रगती केली असली तरी जीवनावश्यक असलेले रक्त निर्माण करण्याची शक्ती कुणासही अवगत नाही. यासाठी रक्तदान हा एकमेव पर्याय आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाला तरी जीवनदान मिळू शकते़ यामुळे रक्तदान करण्याची संधी सोडणे म्हणजे मोठ्या दानापासून वंचित राहणे होय. लोकमतच्या या आवाहनामुळे आणि श्रद्धेय बाबूजींच्या जयंतीचे औचित्य असल्याने अनेकांनी या राष्ट्रीय कार्यात हिरहिरीने सहभाग घेतला़ रक्तदानाकरिता सकाळपासूनच गर्दी झाली होती़ यात युवकांची तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली़ रक्तदानाचे महत्त्व युवकांना समजल्याचे शिबिरातील उपस्थितीवरून दिसून आले़रक्तदान शिबिरात मोहन मानमोडे, शूभम वालूरकर, अक्षय ढुमणे, धनंजय नाखले, प्रतीश चौधरी, मयूर राऊत, अनिल वांदुरकर, योगेश महाजन, निलेश राऊत, शिरीष खैरकर, सूरज निमजे, सोनम ढेंगरे, उमेश पाटील यांच्यासह युवक-युवतींनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्य पार पाडले़ रक्तसंकलनाचे कार्य लाईफ लाईनच्या डॉ़ प्रीती बांबल यांच्या मार्गदर्शनात अंकिता सांगोडे, ज्योती गोमासे, नेहा सावरकर, हेमा पाटील, प्रशांत दांडेकर, प्रवीण पैघाम, महेश त्रिवेदी यांनी पार पाडले़ (कार्यालय प्रतिनिधी)