शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातून जिल्हा विशेष लेखापरीक्षक अधिकारी बेपत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST

जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था या कार्यालयाच्या माध्यमातून विविध कामे मार्गी लावले जातात. परंतु, या कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून कार्यालय प्रमुखच कार्र्यालयात येत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. जिल्हा विशेष लेखापरीक्षक या नागपूर येथील नरेंद्रनगर येथे राहत असून त्या २३ मार्च पासून कार्यालयात आलेल्या नाहीत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांसह सहकार आयुक्तांकडे तक्रार : तीन महिन्यांपासून ऑफीसला नाहीच, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना मिळतेय बगल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था वर्धा या कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून महिला जिल्हा विशेष लेखापरीक्षक या येत नसल्याने या कार्यालयातील अनेक कामे खोळंबली आहेत. या प्रकरणी काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था या कार्यालयाच्या माध्यमातून विविध कामे मार्गी लावले जातात. परंतु, या कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून कार्यालय प्रमुखच कार्र्यालयात येत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. जिल्हा विशेष लेखापरीक्षक या नागपूर येथील नरेंद्रनगर येथे राहत असून त्या २३ मार्च पासून कार्यालयात आलेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने मुख्यालयी रहावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.परंतु, त्या अजूनही कार्यालयात न येताच नियमित वेतन घेत असल्याने हा प्रकार जिल्हाधिकाºयांच्या सूचनांना बगल देणारा ठरत आहे. या प्रकरणी वेळीच दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनाही पाठविण्यात आली आहे.शुक्रवारी केवळ कर्मचारीच होते हजरलोकमत प्रतिनिधीने शुक्रवारी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता कार्यालयात दोन्ही अधिकारी नसल्याचे पुढे आले.अधिकची माहिती जाणून घेतली असता दोन्ही अधिकाऱ्यांबाबत दिशाभूल करणारीच माहिती देण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.बॉर्डर सील पॉर्इंटवर बोलावतात फाईलीजिल्हा विशेष लेखापरीक्षक या एखाद्या फाईल किंवा महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करायची असल्यास त्या नागपूर मार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या बॉर्डर सील पॉर्इंवर कर्मचाऱ्यांच्या हस्ते ही कागदपत्रे बोलावतात. नकार दिल्यास आपला वरिष्ठ अधिकारी आपल्यावर कारवाई करेल या भीतीने काही कर्मचारी हे कामही करीत असल्याचे तक्रारीत नमुद आहे.अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यास नकारजिल्हा विशेष लेखापरीक्षक आणि त्यांच्या कार्यालयाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांकाची विचारणा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केली असता मोबाईल क्रमांक देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांची बाजू जाणून घेता आली नाही.लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे क्रमप्राप्त आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. शिवाय चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी