वॉटर कप स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:04 IST2018-08-12T23:03:53+5:302018-08-12T23:04:10+5:30

उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

District level result of District Cup results | वॉटर कप स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर

वॉटर कप स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर

ठळक मुद्दे१२ गावांना पुरस्कार : गावकऱ्यांच्या श्रमदानाने झाली जलक्रांती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा -३, २०१८ मध्ये जिल्ह्यात ९६ वर अधिक गावे सहभागी झाले होते. त्यानंतर काही गावांनी माघार घेतली. परंतु अनेक गावांनी ४५ दिवस श्रमदान करून आपले गाव पाणीदार बनविण्याचा वसा उचलला. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून आर्वी तालुक्यातील पिंपळधरीबाई या गावाला तालुका स्तरावरचा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. द्वितीय पुरस्कार बोदड तर तृतीय पुरस्कार हिवरा गावाला देण्यात येणार आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील लिंगा मंडवी ला प्रथम, किन्हाळ्याला द्वितीय तर नांदोरा या गावाला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सेलू तालुक्यात खडका गावाला प्रथम, गायमुखला द्वितीय तर पिंपळगावला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. देवळी तालुक्यात तळणी (भागवत) ला प्रथम, फत्तेपुरला द्वितीय तर कविटगावला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभही पुणे येथे रविवारी पार पडला. या जिल्ह्यातील एकाही गावाला पुरस्कार मिळाला नाही.

अनेकांचे हात लागले श्रमदानात
गावकºयांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी श्रमदानासाठी सहकार्य केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अनेक गावात जाऊन श्रमदान करून नागरिकांचा उत्साह वाढविला.

Web Title: District level result of District Cup results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.