संकटकाळात झाले ‘रेकॅार्ड ब्रेक’ पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 05:00 AM2021-03-18T05:00:00+5:302021-03-18T05:00:06+5:30

खरीब किंवा रबी हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवून पीककर्ज मिळवितात. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला त्यासाठी सुरुवातीला विविध कार्यालयात जावून आवश्यक कागदपत्र गोळा करावे लागतात. हीच कागदपत्रं सादर केल्यावर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यावर यापूर्वी कुठले कर्ज आहे काय, याची शहानिशा केल्यावरच त्याला पीककर्ज योजनेस पात्र ठरवून त्याच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वळती केली जाते.

Distribution of 'record break' peak loans during the crisis | संकटकाळात झाले ‘रेकॅार्ड ब्रेक’ पीककर्ज वाटप

संकटकाळात झाले ‘रेकॅार्ड ब्रेक’ पीककर्ज वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देमहात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा परिणाम : ७० हजार १५१ शेतकऱ्यांना मिळाले ७३८.९४ कोटी

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : मागील सहा आर्थिक वर्षांचा विचार केल्यास यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक पीककर्ज वितरित झाल्याची नोंद अग्रणी बँकेने घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील ७० हजार १५२ शेतकऱ्यांना विविध बँकांकडून पीककर्ज म्हणून ७३८.९४ कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा कर्जमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानेच सर्वाधिक पीककर्ज वितरित झाल्याचे सांगण्यात आले.
खरीब किंवा रबी हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवून पीककर्ज मिळवितात. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला त्यासाठी सुरुवातीला विविध कार्यालयात जावून आवश्यक कागदपत्र गोळा करावे लागतात. हीच कागदपत्रं सादर केल्यावर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यावर यापूर्वी कुठले कर्ज आहे काय, याची शहानिशा केल्यावरच त्याला पीककर्ज योजनेस पात्र ठरवून त्याच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वळती केली जाते. जिल्ह्यात अडीच लाखांच्यावर शेतकरी असून, बहुतांश शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकेकडून पीक कर्ज घेतात. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वर्धा जिल्ह्याला पीककर्ज वाटपाचे १०२८.९६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी जिल्ह्यातील तब्बल ७० हजार १५२ शेतकऱ्यांना पीककर्जापोटी ७३८.९४ कोटींची रक्कम वितरित केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षात कोरोनामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असताना पीककर्ज वेळीच मिळाल्याने दिलासा मिळाला.

अन् कर्जखाते झाले निल 
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्तीची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांचे बँक खाते वेळीच निल झाले. अशातच रितसर अर्ज सादर करून अनेक शेतकऱ्यांनी पीककर्जाची मागणी केली. शेतकऱ्यांवर कुठलाही कर्जाचा बोझा न राहिल्याने बँकांनाही शेतकऱ्यांना पीककर्ज वेळीच वितरित करता आल्याचे सांगण्यात आले.
 

५२ हजार शेतकऱ्यांना मिळाला कर्जमुक्तीचा लाभ
महाविकास आघाडी सरकारने जाहीर करीत प्रत्यक्ष कृतीत आणलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनातील जिल्हा उपनिबंधक विभागाने घेतली आहे.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली. इतकेच नव्हे तर बँकांकडून एकाच वेळी कर्जाच्या परतफेडबाबत विविध योजना राबविण्यात आल्या. या दोन्ही बाबींमुळे शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज मोठ्या प्रमाणात निल झाले. त्यामुळेच यंदा पीककर्ज योजनेच्या लाभासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र ठरले. फेब्रुवारी अखेरपर्यंत ७० हजार १५२ शेतकऱ्यांना पीककर्जापाेटी ७३८.९४ कोटींची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
- वैभव लहाने, प्रबंधक, अग्रणी बँक, वर्धा.

 

Web Title: Distribution of 'record break' peak loans during the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.