ंशवविच्छेदनगृहाला झुडपांचा विळखा
By Admin | Updated: May 20, 2014 23:50 IST2014-05-20T23:50:32+5:302014-05-20T23:50:32+5:30
स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे़ समोरचा परिसर झाडा-झुडपांनी वेढला आहे़ मृत्यूनंतर प्रेतांचे शवविच्छेदन करण्यासाठी जाणार्या नातेवाईकांना

ंशवविच्छेदनगृहाला झुडपांचा विळखा
सेलू : स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे़ समोरचा परिसर झाडा-झुडपांनी वेढला आहे़ मृत्यूनंतर प्रेतांचे शवविच्छेदन करण्यासाठी जाणार्या नातेवाईकांना ही अवस्था पाहिल्यावर संताप यावा, अशी स्थिती आहे़ रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे़ शासन कितीही कल्याणकारी योजना राबवित असले तरी त्याचा लाभ सामान्य नागरिकांना मिळताना खूप अडचणी येतात़ अपघाती निधनानंतर वा आवश्यक प्रसंगी मृतांचे शवविच्छेदन करण्यात येते़ रात्रभर प्रेत त्या खोलीत तसेच टाकून दिले जाते़ अपघातात छिन्नविछिन्न झालेल्या मृतदेहाची दुर्गंधी सुटते़ शासनाने यासाठी ग्रामीण रुग्णालयाला दोन मृतदेह ठेवता येईल, अशी शीतपेटी (टु बॉडी मरच्युरी कॅबिनेट) दिली; पण गत वर्षभरापासून ती मशीन ठेवण्यासाठी आवश्यक खोली उपलब्ध नाही़ नव्याने खोली बांधण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावित आहे; पण एवढ्या काळात एका खोलीच्या बांधकामाअभावी ती शीतपेटी लावण्यात आली नाही़ यामुळे मृतदेहांची मृत्यूनंतरही अवहेलनाच होत असल्याचे दिसून येते़ शवविच्छेदन करण्यासाठी काही डॉक्टर नकार देतात़ प्रसंगी पोलिसांनाही मनस्ताप सहन करावा लागतो़ नातेवाईकांकडून अशाप्रसंगी भावनेचा उद्रेक होतो़ येथे आक्रतीबंधाप्रमाणे दोन स्वापरच्या जागा आहेत़ एक महिला स्वीपर कार्यरत असून पुरूषाची जागा रिक्त आहे़ परिणामी, शवविच्छेदनासाठी वर्धा येथून स्वीपर येईपर्यंत शवविच्छेदनाचे कार्य अडून राहते़ प्रसंगी तो आला नाही तर मृतदेहाचा प्रवास पुन्हा वर्ध्याला करण्याची दुर्दैवी वेळ येते़ या ग्रामीण रुग्णालयात एका महिला (गायनिक) डॉक्टरची गरज आहे़ पुरूष डॉक्टरांना महिला काही आजार सांगण्यास संकोच करतात़ तात्पुरत्या पाठविलेल्या त्या डॉक्टरऐवजी एक महिला (गायनिक) डॉक्टर देण्याची मागणी आहे़ ग्रामीण रुग्णालयात तात्पूरत्या आलेल्या डॉक्टरच्या अविवेकी बोलल्याने प्रसंगी वाद उद्भवतात़ येथील इतर चांगल्या सेवाभावी डॉक्टरांना याचा अकारण मनस्ताप होत आहे़ वरिष्ठांनी त्वरित शीतपेटी लावण्यासाठी खोलीचे बांधकाम करून द्यावे व एका महिला डॉक्टराची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)