नुटा शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्र्यांची चर्चा
By Admin | Updated: July 28, 2014 23:42 IST2014-07-28T23:42:27+5:302014-07-28T23:42:27+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येथील शासकीय बैठकीला शहरात आले असता महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या शिष्टमंडळाने प्रलंबित मागण्यांबाबत भेट घेऊन चर्चा केली. तसेच वर्धा जिल्हा

नुटा शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्र्यांची चर्चा
वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येथील शासकीय बैठकीला शहरात आले असता महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या शिष्टमंडळाने प्रलंबित मागण्यांबाबत भेट घेऊन चर्चा केली. तसेच वर्धा जिल्हा नुटा संघटनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून निषेध केला आणि निदर्शन दिली.
यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली. प्राध्यापकांच्या समस्या समजून घेतल्या. तसेच उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा करुन उचित निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले. या चर्चेत शिष्टमंडळाने नेट-सेट परीक्षेची सूट, समाजकार्य व आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना पेन्शन योजना लागू करणे, विशेष वेतनश्रेणी १४ हजार ९४०, ग्रॅज्युएटी याबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालय यांचा निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करणे या विषयावर आग्रही भूमिका मांडली. यासह प्राध्यापकांच्या अनेक प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
जिल्ह्यातील प्राध्यापक या निदर्शनात सहभागी झाले होते. शिष्टमंडळात नुटाचे उपाध्यक्ष डॉ. विलास ढोणे, अविनाश साहूरकर, डॉ. दीपक पूनसे, राजू निखाडे, डॉ. उत्तम पारेकर, डॉ. अनिल सुरकार, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. निरंजन ब्राम्हणे, डॉ. प्रकाश वनकर, डॉ. डी.बी. राऊत, प्रा. मनोहर पिंपळे आदी सहभागी झाले होते.(स्थानिक प्रतिनिधी)