शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सवलत

By admin | Updated: July 17, 2014 00:17 IST

खरीप हंगामामध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खरीप, ज्वारी, सोयाबिन, तूर व कपाशी पिकांकरिता सर्व तालुका, खरीप भुईमुंग पिकांकरिता आर्वी, आष्टी व कारंजा ही

वर्धा : खरीप हंगामामध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खरीप, ज्वारी, सोयाबिन, तूर व कपाशी पिकांकरिता सर्व तालुका, खरीप भुईमुंग पिकांकरिता आर्वी, आष्टी व कारंजा ही तीन तालुका भुईमूग, मुंग, उडीद व तीळ पीक आर्वी तालुक्यातील व ऊस पुर्व हंगामी व ऊस खोडवा पिकांकरिता आर्वी, वर्धा, सेलू, देवळी व ऊस करिता आवी, वर्धा, सेलू व समुद्रपूर या चार तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे. पीक विमा योजनेसाठी वर्धा जिल्ह्याच्या विमा हप्ता दरात अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना ५० टक्के सर्व पिके व कापूस पिकांसाठी अल्प, अत्यल्प शेतकरी ७५ टक्के व इतर शेतकरी यांना ५० टक्के विशेष सुट देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अधिसुचित तालुका अधिसुचित पीक व अधिसुचित मंडळे याची यादी संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात या योजनेत सहभागी होण्याची अंतीम तारीख पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै २०१४ यापैकी जी तारीख लवकर असेल त्या तारखेच्या आत सहभागी व्हायचे आहे. पूर्व हंगामी ऊस पिकासाठी लागणीपासुन एक महिना किंवा डिसेंबर २०१४ तसेच ऊस खोडवाकरिता ३१ मे २०१५ व सुरु ऊसाकरिता ३१ मार्च २०१५ पर्यंत सहभागी व्हायचे आहे.पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीकडून वैयक्तीक आपत्तीमुळे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तीकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतलेला आहे त्या संबंधीत वित्तीय संस्थेस किंवा भारतीय कृषी विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त अधिसूचीत पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय कृषी विभाग कंपनीने जिल्हा महसूल कार्यालयाच्या मदतीने नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे. सदर योजना पीक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नावर आधारीत असून, हवामान आधारीत पीक विमा योजनेचा या योजनेशी संबंधीत नसल्याचे माहितीपत्रकात नमुद केले आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. ही शेतकऱ्यांच्या हिताची योजना असल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)