शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

थेट लाभार्थी योजना थंडबस्त्यात

By admin | Updated: July 2, 2014 23:23 IST

केंद्र व राज्य शासनाने ६५ वर्षांवरील निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना सुरू केली़ प्रारंभी योजना व्यवस्थित चालली; पण आता लाभासाठी महिनोगिनती प्रतीक्षा

तीन महिन्यांचे मानधन थकले : निराधार योजनेतील २७ हजार लाभार्थी वंचितअमोल सोटे -आष्टी (श़)केंद्र व राज्य शासनाने ६५ वर्षांवरील निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना सुरू केली़ प्रारंभी योजना व्यवस्थित चालली; पण आता लाभासाठी महिनोगिनती प्रतीक्षा करावी लागत आहे. वर्धा जिल्ह्यात गत ३ महिन्यांपासून २७ हजार लाभार्थी मानधनाविना आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.निराधार योजनेचे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने सोयीचे होते. आता नव्याने त्यात बदल करून गॅस सबसीडीप्रमाणे लाभार्थ्यांचे मानधन थेट लाभार्थी योजनाद्वारे सीपीएसएमएस प्रणाली-मार्फत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविले. यासाठी जिल्ह्यातील आठही तहसीलदारांकडून मानधनाची रक्कम बोलवून एका एजंसीकडे सुपूर्द केली. त्या एजंसीचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असल्याचे सांगण्यात येते़ यात लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाही. तहसीलदार कार्यालयाने गट अ, गट ब या दोन्ही मिळून ३ हजार ८७३ लाभार्थ्यांचे ६७ लाख रुपये १० जूनला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले़ तेथून प्रक्रिया पूर्ण होऊन संजय शर्मा यांच्या एजंसीकडे जमा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनीही दिल्ली येथे पाठविल्याचे सांगितले. संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भरत वणझारा यांनी शर्मा यांना विचारणा केली असता दिल्लीवरून मंजुरी आली नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगण्यात आले़ १ एप्रिल २०१४ पासून निराधार योजनेचा जिल्हास्तरावरील कार्यभार जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना सांभाळत आहे. असे असताना निराधारांकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वच लाभार्थी आज ना उद्या मानधन येईल, या आशेवर जगत आहेत़ यापूर्वी गॅस सबसीडी आॅनलाईन राबविली; पण यात घोळ झाल्याने ती बंद केली़ हा प्रयोगही अयशस्वी झाला; शासन मनमानी थांबविताना दिसत नाही. लाभार्थी मानधनाअभावी संकटात सापडले आहे. शासनाने थेट लाभार्थी योजनेचा नाद सोडून पैसे वाटप करण्याची मागणी होत आहे़