डिझेलचे भाव घसरले, तिकीट दरही कमी करा

By Admin | Updated: December 24, 2014 23:06 IST2014-12-24T23:06:00+5:302014-12-24T23:06:00+5:30

डिझेल दर कमी झाले, आता एसटीच्या तिकीटाचे दर कमी करावे, असा सूर येथील प्रवाशांमधून ऐकायला मिळत आहे.

Diesel prices have declined, reduce ticket rates | डिझेलचे भाव घसरले, तिकीट दरही कमी करा

डिझेलचे भाव घसरले, तिकीट दरही कमी करा

तळेगाव (श्या.पं.) : डिझेल दर कमी झाले, आता एसटीच्या तिकीटाचे दर कमी करावे, असा सूर येथील प्रवाशांमधून ऐकायला मिळत आहे.
दर महिन्याला डिझेल दरात वाढ होत असताना दर महिन्याला एसटीच्या तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली, परंतु गेल्या महिन्यांपासून डिझेलचे दर ८ ते १० रूपयाने कमी झाल्यामुळे एसटी तिकीटाचे दर मात्र कमी करण्यात आले नाही. त्यामुळे डिझेलचा फटका गरीब प्रवाशांना अद्यापही सोसावा लागत आहे. डिझेलच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्यामुळे त्वरीत एसटी बसचीही भाडेवाढ कमी करावी, असा सूर सामान्य प्रवाशांकडून ऐकायला मिळत आहे.
महिन्याभरापूर्वी डिझेलचे दर प्रतिलिटर ६७ रूपये ८० पैसे होते. त्यात तीन ते चारवेळा मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आले. आता मात्र डिझेलची किंमत प्रतिलिटर ५७ रूपये ८ पैसे इतकी आहे. मागील दरापेक्षा तब्बल १० रूपये प्रतिलिटर मागे कपात करण्यात आली असताना मात्र गोरगरीबाची जीवनदायी एसटीबस भाडे वाढ मात्र अद्यापही कायम आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जात असल्यामुळे खाजगी प्रवासाकडे जनतेचा कल वाढताना दिसून येते आहे. परिणामी एसटी बसेस रिकाम्या धावत असून अवैध प्रवासी वाहतूक दराचे उत्पन्न वाढत आहे. रोजंदारीसाठी गावाकडून शहराकडे जाणारा मजूरवर्ग एसटीने प्रवास करतो. दोनॉवेळच्या अन्नासाठी तो १० ते १५ कि़मी. अंतर करून रोजंदारीसाठी शहरात येतो. ये-जासाठी पन्नास रूपये रोज प्रवास भाडे माजोवे लागते. मिळणारी मजुरी केवळ २०० रूपये इतकी असते. त्याला दीडशे रूपयामध्ये तो आपल्या संसाराचा गाढा चालवितो. त्यामुळे हेच का ते अच्छे दिन, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारताना दिसून येत आहे.(वार्ताहर)

Web Title: Diesel prices have declined, reduce ticket rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.