महिला सक्षमीकरणासाठी विकासात्मक धोरण
By Admin | Updated: June 20, 2016 01:56 IST2016-06-20T01:56:19+5:302016-06-20T01:56:19+5:30
केंद्र सरकारने सर्वसामान्यांसह महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहे. महिलांना आणखी बळ देऊन त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

महिला सक्षमीकरणासाठी विकासात्मक धोरण
पंकज भोयर : विकास पर्वानिमित्त महिला मेळावा
वर्धा : केंद्र सरकारने सर्वसामान्यांसह महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहे. महिलांना आणखी बळ देऊन त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेले विकासात्मक धोरण राबवीत असल्याचे मत, आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले. सेलू येथील महिला मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन खा. रामदास तडस यांनी केले. अध्यक्षस्थानी आ. डॉ. पंकज भोयर होते तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती मंजुषा दुधबडे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ललिता दारोकार, पं.स. सदस्य अशोक कलोडे, प्रफुल्ल गणवीर, भाजपा तालुका सरचिटणीस संजय अवचट, भाजपा महिला आघाडी प्रमुख सारिका देवतारे, राजेश झाडे, संतोष वांदीले, बचत गटाच्या समन्वयक नलू गौळकार, हेमंत नाईकवाडे, सदानंद वानखेडे, टाकळीचे सरपंच रवी बेसेकर वडगाव (खुर्द) चे सरपंच भांडेकर, वडगाव (कला) चे सरपंच छाया दुर्गे, भाजपाच्या तालुका चिटणीस खोडके, तालुका सचिव गहरोले, रोहिणी चिचखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतरही महिलांचा हवा तसा विकास झाला नाही. गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारने महिलांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहे. या योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती आ. भोयर यांनी दिली. ग्रामीण भागातील महिलांना शेतीच्या माध्यमातून रोजगार मिळतो. परंतु हा रोजगार कायमस्वरूपी नसतो. त्यामुळे महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शेतीपुरक व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही आ. भोयर यांनी यावेळी दिली. यानंतर मानयवरांनी विचार व्यक्त केले. मेळाव्याला परिसरातील महिला उपस्थित होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)