शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आजनसरा देवस्थानचा विकास; पण गाव भकासच

By admin | Updated: February 26, 2017 00:58 IST

विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानची किर्ती व प्रसिद्धी दररोज वाढत आहे.

विकासाकडे दुर्लक्ष : ग्रा.पं. प्रशासन व देवस्थानचा पुढाकार गरजेचा अल्लीपूर : विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानची किर्ती व प्रसिद्धी दररोज वाढत आहे. तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने देवस्थान परिसराचा विकासही होत आहे; पण गावे मात्र भकासच असल्याचे चित्र आहे. हे चित्र पालटण्याकरिता गावांचा विकास होणे गरजेचे झाले आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून या गावात दररोज पुरण पोळीचा नवस फेडण्यासाठी म्हणून हजारो भोजाजी भक्त स्वयंपाक घेऊन येतात. संत भोजाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यास्तव भाविकांच्या रांगा लागतात. असे असले तरी आजनसरा गावाचा विकास होताना दिसत नाही. वडनेर व सिरजगाव रस्त्याने गावात प्रवेश करताना दुरवस्था समोर येते. हागणदारीयुक्त रस्ते, अस्वच्छता, खड्डेमय रस्ते, नाल्याची सोयच नसलेले गाव भाविकांच्या दृष्टीस पडते. सर्वदूर किर्ती पसरलेले गाव प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर ‘नाव मोठे, दर्शन खोटे’, असेच भासते. शासन ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, हागणदारी मुक्ती, शौचालय बांधकाम, आरोग्यावर लाखो रुपये खर्च करीत आहे; पण ते येथे कागदोपत्रीच खर्च झाल्याचे दिसते. आजनसरा ग्रा.पं. चे सचिव सुटे एक महिन्यापासून आजारी असून रजेवर असल्याचे सांगतात. ग्राम सफाईसाठी एक कर्मचारी होता; पण त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याने तोही कामावर येत नाही. मी गावात येताच नक्की लक्ष देईल, असे सचिव सांगतात. परिणामी, या गावात ग्रा.पं. प्रशासन आहे की नाही, शासनाच्या योजना लागू आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. देवस्थानसमोर नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. गावात अस्वच्छता असून शेणखताचे ढिगारे, केरकचरा रस्त्याच्या कडेलाच पडून असतो. पऱ्हाट्याचे ढिगारे, घाण पसरली आहे. ग्रा.पं. प्रशासन व देवस्थानने गाव विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)