शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील रिकाम्या भूखंडामुळे विकास खुंटला

By admin | Updated: September 30, 2016 02:24 IST

धोरणात्मक अभावामुळे येथील औद्योगिक वसाहत अनेक कारणांनी चर्चेत आहे. वसाहत परिसरातील खाली भूखंडाना रिसेलमध्ये विकण्यासाठी दलालांची साखळी कार्यरत आहे.

रिकामे भूखंड चढ्या दरात विकण्यासाठी दलालांची साखळीहरिदास ढोक  देवळीधोरणात्मक अभावामुळे येथील औद्योगिक वसाहत अनेक कारणांनी चर्चेत आहे. वसाहत परिसरातील खाली भूखंडाना रिसेलमध्ये विकण्यासाठी दलालांची साखळी कार्यरत आहे. ज्यांनी गत दोन वर्षांत खाली भूखंडात कोणताही उद्योग सुरू केला नाही, अश्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून बीसीसीचे (बिल्डींग कम्प्लेंट सर्टिफिकेट) प्रमाणपत्र दिले जात आहे. अधिकाऱ्यांसोबतच्या साटेलोट्यातून तसेच चिरीमीरीच्या व्यवहारातून हा सर्व प्रकार होत असल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये सोयीच्या लोकांनी भूखंड अडवून ठेवल्याने गरजू उद्योजकांवर अन्याय होत आहे.देवळीची औद्योगिक वसाहत ६४२ एकरात थाटण्यात आली. सन १९९४ मध्ये या वसाहतीला ‘डी’ प्लसचा दर्जा प्राप्त होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यामध्ये १०१ भूखंड पाडून यापैकी ९५ भूखंडाचे उद्योजकांना वाटप करण्यात आले. परंतु काही उद्योजकांनी फक्त नावापुरतेच भूखंड घेऊन ठेवल्याने मागील २२ वर्षापासून हे भूखंड रिकामे पडले आहे. अश्या भूखंडाची संख्या ३० च्यावर आहे. खाली भूखंडाबाबतच्या शासनाच्या बदलत्या धोरणामुळे अडचणीत आलेल्या काहींनी मागील दोन वर्षात या भूखंडाची रिसेलमध्ये विक्री केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार ठरलेल्या दलालामार्फत चढ्याभावाने करण्यात आले. अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याने लाखोचे व्यवहार बिनबोभाटपणे तसेच सोयीच्या लोकांसोबत करण्यात आले. व्यवहारात दोन वर्षांचा कालावधी होवून सुद्धा या भूखंडावर कोणताही उद्योग उभारला गेला नाही. त्यामुळे हे सर्व भूखंड आजच्या घटकेला रिकामे पडले आहे. या रिकाम्या भूखंडावर उद्योगांची निर्मिती करण्यात यावी, अन्यथा कारवाई करून हे भूखंड ताब्यात घ्यावी, अशी मागणी आहे. अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यातून बीसीसीचे प्रमाणपत्र भूखंडातील कोणतीही कारवाई टाळण्यासाठी या जागेवर १५० ते २०० चौ. फुटाचे ओटे बांधून संबंधित वसाहत अधिकाऱ्यांकडून बीसीसीचे प्रमाणपत्र घेण्यात आले. वास्तविक भूखंडाच्या एकूण आराजीपैकी कमीत कमी २० टक्के पर्यंतच्या जागेत ईमारतीचे बांधकाम केल्यानंतरच बीसीसी प्रमाणपत्र देण्याचा नियम आहे; परंतु या सर्व नियमांना संबंधित अधिकाऱ्यांनी याठिकाणी मूठमाती दिली आहे. कोणताही उद्योग न लावता खाली भूखंड अडवून ठेवण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात आहे. उद्योजक दलाल व अधिकारी यांचे साटेलोटे याला कारणीभूत आहे. खाली भूखंड अडवून धरल्याने या वसाहतीला अखेरची घरघर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.