दारूच्या दोन हातभट्ट्या नष्ट
By Admin | Updated: October 19, 2016 01:38 IST2016-10-19T01:38:40+5:302016-10-19T01:38:40+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सेलू तालुक्यातील गोयदा (धामणगाव) शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर धाड घातली.

दारूच्या दोन हातभट्ट्या नष्ट
वर्धा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सेलू तालुक्यातील गोयदा (धामणगाव) शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर धाड घातली. या धाडीत दोन वारस गुन्हे नोंदविण्यात आले. त्यात एक तीन चाकी आॅटो व एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. या प्रकरणी गणेश जाणबाजी नेमोडे, सुनील किसना ठाकरे, हरिश रमेश कुकेकार, सर्व रा. धामणगाव या तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण १ लाख १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही प्रभारी पोलीस निरीक्षक डी.बी. कोळी, दिलीप वल्के, तसेच जवान एच.एस. सुरजुसे, अमीत नागमोते, वाहनचालक राजेंद्र म्हैसकर, बंडू घाटुर्ले यांनी सहभाग घेतला होता.(प्रतिनिधी)