शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापेक्षा डेेंग्यू भारी, आता सर्वांनी घ्यावी खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:01 IST

डेंग्यूचा आजार दरवर्षीच डोके वर काढतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्यांचे रुपांतर डासात होते. हे डास दिवसाच चावा घेत असल्याने ‘छोटी छोटी युक्ती, करी डेग्यू पासून मुक्ती’ अशी आरोग्य विभागाच्या जनजागृतीतील म्हण प्रचलित आहे.

ठळक मुद्देजागतिक डेंग्यू दिन : तीन वर्षांमध्ये तेरा व्यक्तींचा झाला मृत्यू, कोरडा दिवस पाळणे हा प्रभावी उपाय

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचे संकट कायम असतानाच आता पावसाळा काही दिवसांवर आला आहे. यादरम्यान काही ठिकाणी पाण्यांचा तुटवडा जाणवायला लागल्याने नागरिकांकडून पाण्याची साठवणूक केली जाते. त्याच साठविलेल्या पाण्यामध्ये एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू या आजाराचा प्रसार होतो. या आजारामुळे गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनापेक्षाही डेंग्यूचा मृत्यूदर जास्त असल्याने आता कोरोनासोबतच डेंग्यूचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे.डेंग्यूचा आजार दरवर्षीच डोके वर काढतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्यांचे रुपांतर डासात होते. हे डास दिवसाच चावा घेत असल्याने ‘छोटी छोटी युक्ती, करी डेग्यू पासून मुक्ती’ अशी आरोग्य विभागाच्या जनजागृतीतील म्हण प्रचलित आहे. रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. उलट्या होणे, डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होणे, अशक्यतपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, अशी लक्षणे दिसून येतात. या आजारामध्ये रुग्णांचे रक्तपेशी झपाट्याने कमी होऊन रुग्णाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. कोरोना हा आजार नवा असला तरी त्याच्यापासून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ ५ टक्केच आहे पण, डेंग्यू आजार आपल्या सर्वांच्या माहितीतील असून त्याचे प्रमाण कोरोनोपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे आज जागतिक डेंग्यू दिनानिमित्ताने घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, नाल्यांची नियिमित स्वच्छता करणे याबाबत संकल्प करुन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करुया.नागरीकांनी घ्यावयाची काळजीआठवड्यातून एकदा पाण्याचे साठे कोरडे करावे, पाण्याचे साठे घट्ट झाकून ठेवावे, कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपतांना अंगभर कपडे घालावीत. सायंकाळी ६ ते ८ यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे व जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे यांनी केले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू