स्वातंत्र्यदिनी ठरणार गावविकासाचा आराखडा
By Admin | Updated: August 12, 2014 00:04 IST2014-08-12T00:04:16+5:302014-08-12T00:04:16+5:30
ग्रामविकासाच्या योजना तयार करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने ग्रामस्थांना हाक दिली आहे़ आता स्वातंत्र्यदिनीच गावविकासाचा आराखडा ठरणार आहे़ यासाठी ग्रामसभेत

स्वातंत्र्यदिनी ठरणार गावविकासाचा आराखडा
विजय माहुरे - घोराड
ग्रामविकासाच्या योजना तयार करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने ग्रामस्थांना हाक दिली आहे़ आता स्वातंत्र्यदिनीच गावविकासाचा आराखडा ठरणार आहे़ यासाठी ग्रामसभेत नियोजन करण्याचे आवाहनही शासनाने केले आहे़
स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेत नियोजन विकासाचा आराखडा तयार करावयाचा आहे़ नरेगा अंतर्गत कामांची आखणी करून नियोजन करण्याचे पूर्ण अधिकार ग्रामस्थांना देण्यात आले आहेत़ स्वातंत्र्यदिनी प्रत्येक ग्रा़पं़ मध्ये ग्रामसभा होणार आहे. तत्पूर्वी १२ ते १४ आॅगस्ट दरम्यान ग्रा़पं़ च्या विशेष बैठका घेऊन नरेगाच्या कामाचे नियोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाद्वारे राज्यातील सर्व ग्रा़पं़ द्वारे डिजीटल बॅनर लावून ग्रामस्थांपर्यंत माहिती पुरविली जात आहे. नरेगा योजनेत मागेल त्याला काम असल्याने गाव विकासाला चालना मिळणार आहे़ शिवाय ग्रामसभा जनसामान्यांकरिता महत्त्वपूर्ण ठरणार आहे़
राज्यातील सर्व ग्रा़पं़ मध्ये स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा आयोजित आहे़ सेलू तालुक्यात एका ग्रामसचिवाकडे दोन, काहींकडे तीन ग्रा़पं़ चा कार्यभार आहे. बहुतांश सचिवांकडे दोन ग्रा.पं. चा कार्यभार असल्याने एकाच दिवशी ग्रामसभा पार पाडण्यासाठी त्यांना तारेवरची कसरतच करावी लागणार असल्याचे चित्र आहे.