भाजप सरकारात लोकशाहीतील पारदर्शकता हरविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 23:38 IST2018-07-07T23:36:52+5:302018-07-07T23:38:27+5:30

केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सामान्यांचे राहिले नाही. जनतेचा सरकारवर विश्वास उरलेला नाही. लोकशाहीत पारदर्शकता असणे अपेक्षीत आहे; पण कुठेही तसे दिसत नाही.

Democracy lost transparency in the BJP government | भाजप सरकारात लोकशाहीतील पारदर्शकता हरविली

भाजप सरकारात लोकशाहीतील पारदर्शकता हरविली

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : लोकजागर पार्टीचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सामान्यांचे राहिले नाही. जनतेचा सरकारवर विश्वास उरलेला नाही. लोकशाहीत पारदर्शकता असणे अपेक्षीत आहे; पण कुठेही तसे दिसत नाही. शहर वाढत चालली आहे, खेडे ओस पडत आहे. त्यामुळे भविष्यात खेडे वाचविण्यासाठी कृषीवर आधारीत उद्योग निर्माण करावे लागतील, असे प्रतिपादन लोकजागर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.
सेवाग्राम येथे लोकजागर पार्टी आणि किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वाकुडकर यांनी लोकजागर पार्टीचा आठ कलमी कार्यक्रम उपस्थितांना समजावून दिला. यात गाव तेथे उद्योग, कृषी धर्म, कृषी संस्कृती, सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, एक गाव एक परिवार, युवा भारत नवा भारत, गतीशिल न्यायालय, पारदर्शक न्याय (कोणत्याही खटल्याचा निकाल तीन वर्षांच्या आत लागला पाहिजे.) तसेच उमेदवारांवरील सर्व खटल्याचा निकाल एक वर्षाच्या आत लागल्यास राजकारणातील गुन्हेगारी नष्ट होईल. आदी मुद्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीवर आधारीत उद्योग निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
किसान मंचाचे प्रताप गोस्वामी यांनी वर्धा जिल्ह्यात कपाशी व तुराट्या याच्या आधारावर उद्योग निर्माण होवू शकतो. अगरबत्ती काडी मलेशिया व चाईनावरून आणावी लागते. विदर्भात बांबू मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतो. त्यावर आधारीत उद्योग निर्माण झाल्यास दहा लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले.
कार्यशाळेला लोकजागर पार्टीचे राष्ट्रीय महासचिव महादेव मिरगे, जयप्रकाश पवार, डी. व्ही. पडीले, जिल्हाध्यक्ष मनिष नांदे यांच्यासह वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, जवळगाव, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि लातुर, ठाणे, गडचिरोली येथील पदाधिकारी तसेच कार्यकत्यांची उपस्थिती होती.

Web Title: Democracy lost transparency in the BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा