शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जास्त नाही रास्त आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:56 IST

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ऊर्ध्व वर्धा, निम्न वर्धा, लाल नाला, पोथरा, बोर व इतर प्रकल्पल्पग्रस्तांच्या जमीन संपादीत करुन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. त्यांना अत्यल्प मोबदला देऊन जमीन व घरापासून बेदखल करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यासांठी अनेक आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : समस्याची सोडवणूक न केल्यास तीव्र आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ऊर्ध्व वर्धा, निम्न वर्धा, लाल नाला, पोथरा, बोर व इतर प्रकल्पल्पग्रस्तांच्या जमीन संपादीत करुन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. त्यांना अत्यल्प मोबदला देऊन जमीन व घरापासून बेदखल करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यासांठी अनेक आंदोलन करण्यात आले. तत्कालीन विरोधी आणि आजच्या सत्ताधाऱ्यांनी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते.परंतू सत्ता आल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे कानाडोळा केला जात असल्याने पुन्हा प्रकल्पग्रस्तांना उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला. प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्या ह्या जास्त नसून रास्त आहे, त्यामुळे शासनाने त्याची दखल घ्यावी, असे मत शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष राजेश शिरगरे व उपाध्यक्ष धनराज टुले यांच्या नेतृत्वात गुरुवार २३ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देवेन्द्र हीवरकर, रवींद्र चाफले,आकाश निस्ताने, सुनिल शेंडे, वैभव ठाकरे या प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाकर्त्यांच्या भेटी दरम्यान अग्रवाल बोलत होते. शासकीय नोकºया देऊ शकत नसल्याने प्रत्येकी २५ लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे. उदरनिवार्हाचे साधन व निवास हिसकावून घेतले त्यापैकी अनेक बांधवांना घराचे भूखंड देण्यात आले नाही. अर्जाचा मजकूर संपूर्ण समजून न घेताच अर्ज फेटाळून अपीलात जाण्याचा सल्ला देण्यात येते. कित्येकांना अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र नाहीत, भूखंडांचे ७/१२ नाहीत. बोर प्रकल्पग्रस्तांचे अद्याप पुनर्वसन नाही. अशा अनेक अडचणींमळे प्रकल्पग्रस्त अडचणीत असल्याने शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. त्यामुळे मागण्यांच्या पुर्ततेसाठी सुशिक्षित बेरोजगार संघटनेने आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरु असून जर मागण्या पुर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेच्यावतीने दिला आहे. प्रकल्पग्रस्त संघटनेचे राजेश शिरगरे व धनराज टुले,सूर्योदय संघटनेचे शंकर पाणबुडे व ज्ञानेश्वर कोडापे, प्रकल्पग्रस्त सचिन दहाट,प्रल्हाद वाटकर, मारोतराव क्षीरसागर, अरविंद टोकसे, अवधूत पाटील, प्रभाकर निस्ताने, दिनेश कामडी, सुरेश नारणवरे, महेंद्र मात्रे, दुर्वास पानसे आदिंनी मंडपात विचार व्यक्त केले.उपोषणकर्त्यांच्या जाणल्या व्यथाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील चार दिवसांपांसून सुरु असलेल्या प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन लोकप्रतिनिधींनी त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. आज शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांनी कार्यकर्त्यांंसह भेट देऊन सहकार्याची भूमिका दर्शविली. तसेच प्रशासनाच्या वतीने तहसीलदार व काँग्रेसचे सुधीर पांगूळ यांनीही उपोषण मंडपाला भेट दिली.

टॅग्स :Ashok Shindeअशोक शिंदेTahasildarतहसीलदार