लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिकलसेल रोग जन्मतःच असतो. त्यावर उपचार करण्यासाठी हिमॅटोलॉजिस्ट देशात नगण्य आहे. त्यामुळे एमबीबीएस कोर्स आणि पदव्युत्तर कोर्समध्ये हिमॅटोलॉजी कोर्स समाविष्ट करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (गवई) केली आहे. देशाचे भविष्य बालक व बालिका सुरक्षित राहण्यासाठी सिकलसेल रोगाचा पूर्णपणे नायनाट होणे काळाची गरज आहे. त्यामुळे याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबात रिपाइंने (गवई) यापूर्वीही पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांना निवेदन दिले आहे.
सोबतच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनासुद्धा निवेदन दिले. मेडिकल कमिशन, नवी दिल्लीद्वारा पक्षाला पत्रही प्राप्त झाले आहे, असे रिपाई (गवई) चे प्रदेश उपध्यक्ष गोकुल पांडे, जिल्हाध्यक्ष अॅड नरेंद्र पाटील, निरंजन शर्मा, अॅड. अनिल ओरके, अॅड. पुरुषोत्तम धाबर्डे, उमेश पाटील, धनराज बागेश्वर, अनिल कांबळे आदींनी कळविले आहे. हिमॅटोलॉजीचा अभ्यासक्रम एमबीबीएम कोर्स मध्ये समाविष्ट केला तर देशातील अनेक सिलकलसेल रूग्णांवर वेळेत उपचार मिळतील. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका स्तरावर अनेक डॉक्टर उपलब्ध होतील. अशा आशावाद निवेदनातून व्यक्त केला आहे.