शतकोटी वृक्ष लागवडीसह गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी

By Admin | Updated: February 26, 2015 01:20 IST2015-02-26T01:20:32+5:302015-02-26T01:20:32+5:30

स्थानिक ग्रामपंचायतीच्या शतकोटी वृक्ष लागवडीसह अन्य कामांत अनियमितता आहे़ या संपूर्ण कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रा़पं़ सदस्य रजनी दखणे यांनी केली आहे़ ...

Demand for the sale of 100 hectares of trees | शतकोटी वृक्ष लागवडीसह गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी

शतकोटी वृक्ष लागवडीसह गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी

आकोली : स्थानिक ग्रामपंचायतीच्या शतकोटी वृक्ष लागवडीसह अन्य कामांत अनियमितता आहे़ या संपूर्ण कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रा़पं़ सदस्य रजनी दखणे यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले़
मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीत मजुरांना मस्टरमध्ये नोंद केल्यानुसार मजुरी न देणे, मजुरांच्या नावे खोटे बिल काढणे, झाडे जिवंत नसताना जीवित असल्याचे दाखवून त्यांच्या संगोपनावरचा खर्च दाखवून बिल तयार करणे, पैशाची उचल करणे, रात्रीच्या वेळी नवीन वृक्ष आणून लागवड करणे तसेच झाडांना पाणी देण्याकरिता शेतकऱ्यांच्या नावे खोटे बिल तयार करून पैशाची उचल करणे, शेतकऱ्याला रक्कम न देता ती हडप करणे आदी अनियमितता होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने थातूर-मातूर चौकशीचा बनाव केला़ यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी केली तर डोळे विस्कारेल एवढा मोठा गैरप्रकार वृक्ष लागवडीतून बाहेर येऊ शकतो, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे़
१३ व्या वित्त आयोगाची व दलित वस्ती सुधारणेची कामे अपूर्ण असून झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवीदा न काढता मर्जीतील लोकांना कामे देणे, त्यांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांकडे दुर्लक्ष करणे, खोट्या निवीदा दप्तरी नोंदविणे, निविदा धारकाकडे परवाना आहे वा नाही याची शहानिशा न करताच निविदा मंजूर करणे, कामाचा आदेश दिल्यानंतर त्यातील अटीनुसार काम सुरू आहे वा नाही याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणे आदी गैरप्रकार सर्रास सुरू असल्याचेही नमूद आहे़
यामुळे शतकोटी वृक्ष लागवड व अन्य विकासात्मक कामांत झालेल्या गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य रजनी दखणे यांनी केली आहे़ या प्रकरणात जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे ग्रामस्थांसह सदस्यांचे लक्ष लागले आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Demand for the sale of 100 hectares of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.