शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी

By admin | Updated: August 16, 2014 23:39 IST

सारवाडी आणि बांगडापूर परिसरातील गावांत अवैध व्यवसायांनी पुन्हा जोर पकडला आहे़ यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे़ या परिसरातील अवैध व्यवसायांवर नियत्रण ठेवण्यासाठी सारवाडी

गुन्हेगारीमध्ये झालीय वाढ : सारवाडी व बांगडापूर शिवारात अवैध व्यवसायकारंजा (घा.) : सारवाडी आणि बांगडापूर परिसरातील गावांत अवैध व्यवसायांनी पुन्हा जोर पकडला आहे़ यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे़ या परिसरातील अवैध व्यवसायांवर नियत्रण ठेवण्यासाठी सारवाडी आणि बांगडापूर येथे स्वतंत्र पोलीस चौकी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ सारवाडी हे गाव महामार्ग क्र. ६ वर असून कारंजापासून १५ किमी अंतरावर आहे. या गावाभोवती घनदाट जंगलाला लागून सुमारे १५ गावे आहेत. देववाडीला पारधी बेडा आहे. उपलब्ध भौगोलिक परिस्थिती व कारंजा पोलीस ठाण्यापासून अंतर लांब पडत असल्याने पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होते़ याचा गैरफायदा घेत परिसरात अवैध दारू निर्मिती, वाहतूक व वाद वाढले आहेत. असामाजिक तत्वांचा जोर वाढला आहे़ अर्थपूर्ण संबंधांमुळे अवैध व्यावसायिकांवर पोलीस नियंत्रण ठेवण्यात असफल ठरली आहे. सारवाडी येथे आठवडी बाजाराच्या दिवशी खुलेआम दारू विकली जाते़ बांगडापूर हे गाव वर्धा रोववरील चौफुलीवरील महत्त्वाचे गाव आहे. चारही बाजुला १० ते १२ गावे आहेत़ ही सर्व गावे घनदाट जंगलात वसलेली आहेत. कमी लागत, अधिक मागणी व अधिक फायदा असलेला अवैध दारू निर्मितीचा, हातभट्टीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. हा परिवार कारंजा पोलीस ठाण्यापासून ३० किमीपेक्षा अधिक अंतरावर असल्याने पोलीस यंत्रणेला लक्ष ठेवणे कठीण जाते. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने या अवैध व्यवसायाबद्दल माहिती दिली तर पोलीस येईपर्यंत व्यवसायांचे साहित्य गायब केले जाते. ज्यांनी माहिती दिली त्यांना या दारू विक्रेत्यांकडून त्रास होतो़ दारू विक्रेत्यांच्या त्रासामुळे व पोलिसांच्या असहकार्यामुळे परिसरातील अनेक दारूबंदी महिला मंडळांनीही आपली कामे बंद केलीत़ यामुळे दारूचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. विशेष म्हणजे अधिक नशा येण्यासाठी या दारूमध्ये अनेक प्रकारच्या विषारी द्रव्याचा वापर केला जातो़ बांगडापूर चौरस्त्यावरून अवैध वाहतूक करणारी अनेक वाहने जातात. अनेकदा सामान्यांची वाहने अडवून लुटमार व चोरीची प्रकरणेही घडली आहेत़ आदिवासींची संस्था अधिक असल्याने भांडणेही होतात. दारू सहज उपलब्ध होत असल्याने याचे प्रमाण वाढले आहे़ वादाचे पर्यवसान मारहाण व हत्येपर्यंत झाल्याची उदाहरणे आहेत़ एकदंरीत, सारवाडी व बांगडापूर परिसरातील अवैध व्यवसाय तसेच असामाजिक तत्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही ठिकाणी किमान एक जमादार व चार शिपाई, असणाऱ्या पोलीस चौक्या देणे गरजेचे आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देत पोलीस चौक्या स्थापन कराव्यात, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)