शहरात ४० टक्क्यांनी घटली विजेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:11+5:30

कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत.

Demand for electricity in the city decreased by 40 percent | शहरात ४० टक्क्यांनी घटली विजेची मागणी

शहरात ४० टक्क्यांनी घटली विजेची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना, लॉकडाऊनचा परिणाम : १० मेगावॅटने वीजभार कमी

सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी, लॉकडाऊन आणि वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात विजेची मागणी निम्मी म्हणजे ४० टक्क्यांनी घटली आहे.
कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू विक्रीची दुकाने मागील १३ दिवसांपासून बंद आहेत. वातावरणातही सातत्याने बदल होत आहेत. मार्च मध्यंतरी आणि अखेरच्या आठवड्यात तसेच ४ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे वातावरणात अधूनमधून गारवा निर्माण झाला. यामुळे आणि कोरोनाच्या धास्तीने प्रतिष्ठाने आणि घरोघरी कूलर, इतर वातानुकूलित यंत्रांचा होणारा वापर एप्रिल महिना सुरू होऊनदेखील बंद आहे. वर्धा शहरात ३४ हजार ४०० वीजग्राहकांची संख्या आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केवळ शहरात १४०९ अ‍ॅम्पिअर म्हणजे २७.१० मेगावॅट इतका वीजपुरवठ्यापोटी वीज महावितरणवर भार होता. यावेळी (८६७ अ‍ॅम्पिअर) १६.६७ इतका कमी भार आहे. त्यामुळे १० मेगावॅटचा भार या हंगामात कमी झाला आहे.
कोरोना विषाणूला थंड वातावरण पोषक राहत असल्याची अफवा पसरल्याने मार्च महिन्यातच सुरू होणारे कुलर, वातानुकूलित यंत्र यंदा बंद आहे. लॉकडाऊनमुळे विजेचा व्यावसायिक वापर बंद आहे. शासकीय कार्यालये, उद्योगही ठप्प आहेत. घरगुती ग्राहकांकडून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारी विजेची मागणीही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावेळी विजेचा वापर कमी झाल्याचे महावितरणच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मार्च महिन्यात दोनवेळा जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. दरम्यान, अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणच्या मालमत्तेची यात मोठी हानी झाली. मात्र, राज्यात कोरोनाचे वातावरण असतानाही जिवाची पर्वा न करता वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीकार्य सुरूच ठेवले. दरवर्षी उन्हाळ्यात प्रारंभीच विजेची मागणी वाढत असल्याने भार वाढतो. यंदा कोरोना आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे विजेचा वापर कमी झाला, पर्यायाने गतवर्षीच्या तुलनेत यावेळी मागणी घटली आहे.
- डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, वीज महावितरण, वर्धा.
 

Web Title: Demand for electricity in the city decreased by 40 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज